जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday 26 December 2010

ब्रेड रोल्स

काल सकाळी न्याहारी करायचा खुप कंटाळा आला होता. (अहो स्वतः बनवाव लागत. आयत गिळायला मिळत असेल माझी ना कशाला?) दुपारी ऑफिस मध्येपण फळांवर वेळ मारुन नेली. संध्याकाळी खास जेवण बनवायचा मुड न्हवता म्हणुन टाळा टाळ केली. पण रात्री ९ ला पोटात कावळे ओरडायला लागलेच. आता आयत्या वेळी काय कराव असा प्रश्न पडला? काही तरी झटपट होणार आणि पोटाला बर्‍या पैकी आधार देणार असाव अस काही तरी करायच ठरवलं. ब्रेड होताच, फ्रिजर मध्ये मसाला लावलेली कोलंबी पण होती.
पटपट तयारीला लागलो.

एक लहान कांदा,टॅमेटो बारीक चिरुन घेतला.

नारळ खवलेला होता तो काढला.

१ चमचा बडीशेप घेतला.


फ्रिजर मधली हळद-मसाला आणि हिरव वाटण (कोथींबीर + हिरवी मिरची + आल +लसुण) लावुन ठेवलेली कोलंबी काढली.
तिचे लहान (अंदाजे १ से.मी. लांबीचे) तु़कडे केले. त्यावर थोड लिंबु पिळल.


कढईत थोड तेल तापवुन त्यात कांदा गुलाबी होइस्तव परतला.


मग त्यात मसाला लावलेल्या कोलंबीचे तु़कडे टाकुन मस्त परतुन घेतेल.


त्यात टॅमेटो, नारळ, बडीशेप,मीठ टाकुन ५-७ मिनिटे खमंग परतुन सारण तयार केल.


ब्रेडच्या कडा कापुन घेतल्या. एका थाळीत थोड मिठाच पाणी घेतल.
एक ब्रेडची स्लाइस त्या पाण्याय बुडवुन लगेच तळ हातावर दाबुन त्यातल पाणी काढुन टाकल.
त्या स्लाइस वर तयार सारण टाकुन ब्रेडचा रोल वाळला.


ब्रेडच्या कडा दाबुन बंद केल्या.


तव्यावर थोड्याश्या तेलावर हे तयार रोल्स मध्यम आचेवर झटपट तळुन घेतले.


पुदिन्याच्या हिरवी चटणी वा सॉस बरोबर गरमा गरम असतानाच सर्व करा.


1 comment:

  1. व्वा गणपा !!!!!!!!!१मस्त आणि सोपी रेसेपी आहे मी नक्कीच ट्राय करून बघेल.-भाग्यश्री

    ReplyDelete