साहित्यः
१ वाटी बेसन
१ जुडी कोथिंबीर (मध्यम आकाराची) बारीक चिरुन
१ कांदा उभा आडवा चिरुन.
१ चमचा लाल तिखट
१ चमचा धणे पुड.
१ चमचा जीरे.
१/२ चमचा हळद.
२ चमचे तांदळाच पिठ.
२ चमचे हिरव वाटण (मिरची + कोथिंबीर + आल)
२ चमचे तेल.
चवी नुसार मीठ.
फोडणी साठी : १ चमचा तेल , १ चमचा राई/मोहरी
नारळ सजावटी साठी.
कृती:
सगळे जिन्नस एका भांड्यात एकत्र करुन घ्या.
पाणी न टाकता मिश्रण नीट एकजीव करुन घ्याव.
एका पसरट भांड्याला/ताटलीला तेलाच बोट लावून हे मिश्रण त्यात पसरवुन घ्यावे.
कुकरची शिट्टी काढुन इडली प्रमाणे १५ मिनीटं वाफवुन घाव.
गार झाल्यावर वड्या पाडुन वरुन मोहरीची फोडाणी द्यावी.
नारळाने सजवुन गरमा गरम चहा सोबत लुत्फ घ्या
अह्हाहा ... मस्तच.. आता कोण मला देणार.. आत्ता पहिजे.. :(
ReplyDelete