जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday 28 December 2010

व्हेज बिर्याणी

बिर्याणी म्हटली आणि मग त्यात चिकन मटण नसेल तर मग मी तीच्या वाटेला जात नाही. किंबहुनां चिकन मटण गेला बाजार फिश नसेल तर ती बिर्याणीच काय हे माझ ठाम मत. म्हाणुन काल पर्यंत मी व्हेज बिर्याणी कधी चाखलीही नव्हती करायची तर बातच सोडा.
पण शुक्रवारी माझे आंतरजालीय स्नेही पुण्याच्या पेशवे यांची खरड आली आणि त्यांनी सरळ फर्मान सोडल की एक झणझणीत व्हेज बिर्याणीची पाकृ येउदे. आता त्यांना का नेटावर मिळणार न्हवती व्हेज बिर्याणिची पाककृती, पण त्यांनी हक्काने सांगीतल ते मला खुप आवडल. दोन दिवस व्यस्त असल्याने त्यांच्या कडुन रवीवारपर्यंतची सवड मागीतली. कारण बिर्याणि हा प्रकार निगुतीने करायचा आहे. कारण जर काही घाइ गडबड झाली तर त्या बिर्याणीची खिचडी व्हायला वेळ लागणार नाही हे मी जाणुन होतो. अहो नॉनव्हेजला आपली अशी स्वतःची एक चव असते. पण काहीही व्हेज बनवताना त्यात जीव ओतावा लागतो अस माझ मत आहे. नॉनव्हेज बिर्याणीचा अनुभव पाठीशी असला तरी उगाच गोंधळ नको म्हणुन नेटावरुन जरा एक दोन रेशिप्या पाहिल्या पण त्यात मजा नाही आली. मग म्हटल आपणच थोड व्हेरीएशन करुन पाहु.
तर मायबाप रसिकहो जो काय प्रकार केला आहे तो आपल्या पुढे सादर करतोय.
(पाहुन करावीशी वाटलीच तर सुट्टीच्या दिवशीच ट्राय करा.)

साहित्य :


बासमती तांदुळ १ तास आधी भिजत ठेवलेला.



गाजर, बटाटा, फरसबी, फ्लॉवर हिरवी मिरची मोठे तुकडे करुन.



२ मोठे कांदे उभे चिरुन.


४-५ लाल सुक्या मिरच्या.
२-३ तमाल पत्र.
१ इंच दालचीनी.
८-९ लवंग.
१ चमचा काळीमीरी.
१ चमचा शाहीजीरे.
१ चमचा जीरे.
१ चमचा बडीशेप.
१ चमचा खसखस.

काजु.
१/२ चमचा हळद.
१ लहान चमचा बिर्याणी मसाला (असल्यास)
२ चमचे दही
२ चमचे साजुक तुप.
मीठ चवीनुसार.
केशर ४-५ चमचे दुधात भिजवलेला.

कृती:

एका भांड्यात पाणी उकळत ठेवाव.


दुसर्‍या भांड्यात एक चमचा तुपावर थोड जीर ५-६ लवंगा, काळीमीर्‍या, तमाल पत्र परतुन घ्याव.



त्यात भिजवलेला बासमती तांदुळ टाकुन हलक्या हाताने परतुन घ्यावा. जास्त परतु नये. तांदुळ भिजवलेला असल्याने लगेच मोडतो.



मग त्यात उकळते पाणी आणि मीठ घालावे. मध्यम आचेवर एक कणी भात शिजवुन घ्यावा. साधारण ८-१० मिनीटात भात तयार होतो. चाळणीने गाळुन भात वेगळा ठेवुन द्या.



एका फ्राइंग पॅन मध्ये खडा मसाला कोरडा भाजुन घ्यावा.
१/२ चमचा तेलावर थोडा कांदा (१ वाटी) गुलाबी होइस्तो परतुन घ्यावा.




गार झाल्यावर खडा मसाला, कांदा, १ चमचा घट्ट ताज दही मिक्सरमधुन वाटुन एकसम बारीक पेस्ट करुन घ्यावी.




बाकीचा उरलेला कांदा तेलात कुरकुरीत तळुन घ्यावा. काजुपण तळून वेगळे ठेवावे.
(स्वानुभव : कांदा तळण्या आधी त्यात थोड तांदळाच पीठ भुरभुराव आणि मग कांदा तेलात सोडावा. मस्त कुरकुरीत होतो.)



पसरट भांड्यात १ चमचा तेलावर जीर्‍याची पोडणी करावी. मग त्यात सगळ्या भाज्या टाकुन टॉस कराव्या.



मग त्यात १/२ हळद, चवी नुसार मीठ ,१ लहान चमचा बिर्याणी मसाला (असल्यास नसेल तरी चालेल.) टाकुन चांगल मिक्स करुन घ्याव.



नंतर त्यात १ मोठा चमचा दही घालुन भाज्या नीट परतुन घ्याव्या.


१ मिनिटा नंतर त्यात वाटण टाकुन परत सगळ्या भाज्या टॉस करुन घ्याव्या. वाटल्यास एक पाण्याचा हबका मारुन
वर झाकण लावुन १/२ वाफ काढावी.



भाज्या संपुर्ण शिजवुन नाही घ्यायच्या. साधारण ९०% झाल्या की आच बंद करावी.



एका जाड बुडाच्या भांड्याला तुपाच हात लावावा.
सगळ्यात खाली तळलेल्या कांद्याचा एक थर लावावा.



मग वर भाताचा एक थर लावावा.



त्यावर भाज्यांचा थर लावावा.



आणि परत वरुन भाताचा थर लावुन हलक्या हाताने दाबुन सारखा करुन घ्यावा.
लहान काठीने (चॉपस्टीकने) ठारावीक आंतरावर भोक पाडावीत.



त्या भोकातुन केशर भिजवलेल दुध सोडाव. वरुन परत थोडासा तळलेला कांदा भुरभुरावा.
अ‍ॅल्युमिनियमच्या फॉईलने भांडे सिलबंद करुन घ्यावे.
(कणकेने केल तरी चालेल.)



एका पसरट भांड्यात थोड पाणी ठेवुन गॅस वर ठेवाव.



सिलबंद केलल बिर्याणीच भांड या पसरट भांड्यात ठेवाव. वरुन दाब येईल अस झाकण ठेवाव.
मध्यम ते मंद आचेवर १५-२० मिनिटे दम द्यावा.

आता इतकी मेहेनत घेतली आहे तर थोड साधस पण प्रेझेंटेशन हवच नाही का.
अहो पहिल्या नजरेत डिश जर का खवय्याच्या पसंती पडली की १/२ किल्ला तिथेच सर झाला म्हणुन समजा.



5 comments:

  1. purn Pak kruti vahchef hyanchya vegetable biryani chya pak kruti varun uchlali distey..but good efforts :)

    ReplyDelete
  2. सुनिता आता नक्की आठवत नाही.. पण कदाचीत 'वाह रे वाह'वाल्या संजय थुम्माची पाककृती पाहिली असेलच.
    या पुर्वी मी स्वतः व्हेज बिर्याणी कधीच बनवली नव्हती. काही आंतरजालीय मित्रांच्या (वर नामोल्लेख केला आहेच.) आग्रहाखातर बनवली होती. त्यामुळे जालावरच्या १-२ रेसिपींचा आधार घेउनच बनवली आहे. यात दुमत नाही. :)

    ReplyDelete
  3. प्रतिक, तुझे मनापसुन धन्यवाद, मी तुझ्या पाकॄ चा reference घेउन व्हेज-बिर्याणि बनवली आणि सर्वांकडुन कौतुकाची थाप मिळवली :)

    घरबसल्या अता बिर्याणि खायला मिळणार शिवाय हवी तेंव्हा, अजुन काय हवं अयुष्यात. पुन्हा एकदा, मनापसुन धन्यवाद! :D

    ReplyDelete
  4. खादाड प्रतिसादाबद्दल आभारी आहे. :)

    ReplyDelete