वांग्याच नाव काढल्यावर बरेच जण तोंड वाकड करतात. माझ तस एक शेपूची भाजी सोडली तर बाकी कुणाशी वाकड नाहीये. त्यामुळे जे काही ताटात येत त्याला उदार मनाने उदरात जगा देतो.
सध्या मस्त वांग्याचा सिझन आहे. तशी इकडे जवळ जवळ वर्षभर वांगी मिळतात. पण ही असली मोठ्ठी वांगी इथे ठरावीक सिझन मध्येच येतात. नेहमी सारख वांग्याच भरत किंवा काप करुन तळण्या पेक्षा या वेळी काही तरी नवा प्रयोग करावासा वाटला. सद्ध्या बेकिंगच खुळ डोक्यात बसलय. आजची पाककृती ही त्याचीच परिणीती आहे.
तर मग आपला बहुमुल्य वेळ न दवडता लगेच पाककृती कडे वळतो.
साहित्यः
केक सारख याच काही ठरावीक पदार्थ आणि माप नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला आवडतील /उपलब्ध असतीतल त्या भाज्या घ्या. पण वांग मात्र हवच हव.
१-२ मोठ्ठी वांगी. (किती माणस आहेत त्या प्रमाणात.)
१ वाटी मटार दाणे.
२ मध्यम आकाराचे बटाटे.
५-६ मश्रुम.
१ वाटी फ्लॉवर. (जीतका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरुन.)
३-४ टॉमेटो.
३ लसणाच्या पाकळ्या.
१/२ इंच आलं.
१ भोपळी (सिमला) मिरची.
ब्रेडचा चुरा.
चीज.
तेल.
मीठ चवी नुसार.
१/२ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १ चमचा मसाला, १ चमचा जिरे पुड.
कांदा सध्या ईकडे पण दुप्पट महाग झालाय. मी गडबडीत घ्यायलाच विसरलो. जर तुमची ऐपत असेल तर घ्या एखादा वासा पुरता.
५-६ मोठ्या कोलंब्या (ऑपशनल)
(कोलंब्यांना हिरव वाटण, मीठ, मसाला, हळद, आणि लिंबाचा रस लावुन २०-२५ मिनीटं मुरत ठेवाव. )
कृती:
मी एक वांग उभ चिरुन दोन भाग करुन घेतले . तर दुसर्याला वर चित्रात दाखवल्या प्रमाणे आडवे चरे दिले आणि ते मिठाच्या पाण्यात बुडवुन ठेवलं.
फ्लॉवर, टॉमेटो, आल, लसुण, मिरची बारीक चिरुन घेतल. बटाटा कचाच खिसुन घेतला. मश्रुमचे उभे काप करुन घेतले.
ओव्हन २०० °C वर १० मिनिटं तापत ठेवला.
अर्ध्या कापलेल्या वांग्याला तेलाच बोट लावुन ते ओव्हन २५ ते ३० मिनिटं भाजुन घेतल.
थोडं थंड झाल्यावर चमच्याने आतला गर काढुन घेतला. आणि उरलेल वांग बाजुला ठेवुन दिल.
एका कढईत, २ चमचे तेलावर लसुण, आल परतुन घेतल आणि मग त्यात सगळ्या भाज्या (टॉमेटो सोडुन) टाकुन परतुन घेतल्या.
मग त्यात मीठ, मसाले टाकुन चांगल ढवळुन घेतल. वर एक झाकण ठेवुन दणदणीत वाफ काढली.
मग त्यात टॉमेटो टाकुन परतुन घेतल.
१-२ मिनिटांनी त्यात मगाशी वांग्यातुन काढुन ठेवलेला गर टाकुन परत एकदा मोठ्या आचेवर चांगल परतुन घेतल.
नंतर त्या अर्ध्या केलेल्या वांग्यात (खोबणीत) वरच सारण भरल. वरुन थोडा ब्रेडचा चुरा भुरभुरला. आणि मग त्यावर चीज खिसुन टाकल.
आणि हे वांग ओव्हन मध्ये अजुन २०-२५ मिनिट बेक करायला ठेवल.
हे करत असतानाच कोलंब्या तव्यावर अगदी १-२ मिनिटं मोठ्या आचे वर परतुन घेतल्या.
नंतर ते मिठाच्या पाण्यात ठेवलल वांग घेउन त्याच्या चिरांमध्ये सारण भरल. एक खाचे आड एक कोलंबी आणि टॉमेटोच्या चकत्या ठेवल्या.
नंतर हे वांग ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे २००-२५० °C वर बेक करत ठेवल.
हे ते पहिलं उभ चिरलेल वांग बेक केल्या नंतर.
आणि हे नॉव्हेज वर्जन थोड्याश्या सजावटी सोबत.
शेवटी पदार्थ आधी बघुनच मनात भरला पाहीजे. मग तो नावडत्या कच्या माला पासुन जरी बनला असेल तरी न खाणार्याची, खाण्याची इच्छा झाली पाहिजे. काय म्हणता?
कसला इनोवेटिव्ह प्रकार आहे हा.. वांग न आवडणार्यांच्या तोंडालाही पाणी सुटेल
ReplyDeleteHow did make that apple bird? Tyachi kruti milel ka plz?
ReplyDelete@Priyanka here you can get some Idea @ how to make this Apple Swam.
ReplyDeletehttp://www.youtube.com/watch?v=voxesdPFTOE
great
ReplyDelete