जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday, 27 December 2010

चिकन-६५

साहित्य:

३/४ किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करुन.
१ मोठा चमचा आल-लसुण पेस्ट.
३-४ पाकळ्या किसलेला लसुण.
१.५ लहान चमचा वर्‍हाडी ठेचा. (असल्यास)
२ चमचे सोया सॉस.
१ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे लाल तिखट.
३-४ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करुन.
३-४ कडिपत्याची पाने.
१ लहान चमचा घट्ट दही.
१ मोठा चमचा कॉन फ्लॉवर.
२ मोठे चमचे मैदा.
स्वादानुसार मीठ.
आवडत असल्यास तंदुर रंग.
तळण्यासाठी तेल.
कृती:


सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
त्यात सोया सॉस, हळद,आल लसुण पेस्ट, हिरवी मिरची, कडिपत्ता, ठेचा, किसलेला लसुण आणि लाल तिखट टाका.




त्यातच दही, मैदा , कॉन फॉवर, रंग आणि स्वादानुसार मीठ टाका.





चांगल मिक्स करुन १ ते २ तास मुरत ठेवा.




२ तासांनी कढईत तेल तापवून खरपुस तळुन घ्या.



3 comments:

  1. आवडता पदार्थ.. पण मेहेनत फार.. म्हणून बाहेरून आणलेला बरा..

    ReplyDelete
  2. Excellent recipe. what is vahdi techa? thanks

    ReplyDelete
  3. वऱ्हाडी ठेचा हा एक चटणी झारखं पण झणझणीत तोंडी लावण्याचा पदार्थ आहे. हल्ली दुकानातून रेडीमेड मिळतो.
    http://www.chordia.com/tiwebsimages/thecha.jpg
    या पाककृतीत तो ऑप्शनल आहे.

    ReplyDelete