साहित्य:
१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला.
८-१० लसुण पाकळ्या ठेचलेल्या/बारीक चिरलेल्या.
४-५ मिरच्या उभ्या चिरलेल्या.
१/२ लिंबु.
२-३ चमचे काळीमीरी पुड. (बारीक आणि भरड दोन्ही)
कडिपत्ता.
१ चमचा हळद.
२ चमचे सोया सॉस.
मीठ चवी नुसार.
२ चमचे तेल आणि तुप.
१/२ ते ३/४ किलो चिकन मध्यम आकारचे तुकडे करुन आणि मीठ लावुन १०-१५ मिनिटे मुरत ठेवलेले.
कृती:
लसुण तेला तुपावर २ मिनिटं परतुन घ्यावा.
मग त्यात कडिपत्ता, कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकुन परत २ मिनिटं मोठ्या आचेवर परतुन घ्यावे.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात चिकन चे तुकडे टाकुन मध्यम आचेवर परतुन, झाकण लावुन १०-१२ मिनिटे शिजवत ठेवावं.
नंतर त्यात हळद, सोयासॉस,लिंबाचा रस आणि चवी नुसार मीठ टाकुन परत ५ मिनिटे झाकण लावुन शिजु द्यावं.
५ मिनिटांनी झाकण काढुन, मोठ्या आचेवर पाणी आटे पर्यंत परतत रहावं.
पाणी संपुर्ण आटल्यावर त्यात काळी मीरी पूड टाकुन मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतुन घावं.
गरमागरम पेप्पर चिकन.
aajach kela hota ..khup chan jhala hota. Share kelya baddal dhanyawad
ReplyDeletemost welcome Vaibhav :)
ReplyDelete