जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday, 27 December 2010

प्राँस् पालक

पालक पनीर हा प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारा आणि सर्वत्र आवडीने खल्ला जाणार पदार्थ.
पण मला स्वत:ला पनीर जास्त आवडत नाही त्यामुळे आज यात थोडा फेरफार करुन याची नॉनव्हेज आवृत्ती केलेली.

साहित्य :
१ जुडी पालक
१५ - २० मोठ्या कोलंब्या
२ चमचे आल+लसुण पेस्ट
१ चमचा मालवणी मसाला
१ मोठा कांदा बारीक चौकोनी चिरलेला
२ चमचे गरम मसाला
मीठ चवी नुसार
२-३ चमचे तेल
लिंबाचा रस

कृती :पालक नीट धुऊन घ्यावी. एका मोठ्या भांड्यात पाणी घालून त्यात २-३ चम्चे लिंबाचा रस टाकुन पालक शिजवून घ्या.
(शिजताना वर झाकण ठेवु नये. पालकचा हिरवा रंग काळपट होतो.)
पालक ७-८ मिनीटात शीजते. थोडया वेळाने गार झालेली पालक मीक्सर मध्ये घालून पेस्ट करा.पालक शिजतेय तोवर कोळंबिला आल+लसुण पेस्ट, मालवणी मसाला, मीठ, लिंबाचा रस लावुन मुरत ठेवा.

एका भांड्यात २-३ चम्चे तेल घेउन त्यात कोळंबी २-३ मिनिटे परतवुन अर्धवट शिजवुन घ्यावी. आणि वेगळी काढुन ठेवावी.त्याच भांड्यात नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतवावा.
कांदा गुलाबी झाला की त्यात २ चमचे गरम मसाला टकुन चांगला परतुन घ्यावा.
खाली लागत आसल्यास किंचीत पाणी घालाव.बाजुने तेल सुटुलागल्या वर पालकची पेस्ट त्यात टाकावी.
मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजवल्यावर त्यात कोळंबी टाकावी.
मीठ चवी नुसार घालाव . ( मीठ जरा बेताने घालाव कारण पालक मध्ये क्षारांच प्रमाण बरच असत. )
मंद आचेवर ४-५ मिनीट शिजू द्या. शीजताना झाकण ठेउ नये.


गरमा गरम भाता बरोबर किंवा चपाती, भाकरी बरोबर हा प्रकार भन्नाट लागतो.

2 comments:

  1. जमल्यास, मासे विभागात विविध प्रकारचे मालवणी मासे सुद्धा द्यावे….

    ReplyDelete
  2. नक्कीच करुन पाहिन

    ReplyDelete