तिरंगा मलई कबाब, नावातच सार काही आल. एक एक तुकडा तोंडात जाताच विरघळतो. मला बर्यापैकी जमणार्या पाककृतीं पैकी एक. कबाबची पुर्वतयारी आदल्या दिवशीच करुन ठेवली तर चिकन व्यवस्थीत मुरतं आणि कबाब मऊ पण होतात.
लागणार साहित्य:
१/२ किलो बोनलेस चिकन.
ताज दही १ ते १,१/२ वाटी.
२ मोठे चमचे आलं-लसणाची पेस्ट.
हिरवी चटणी (पुदिना + मिरची +कोथिंबीर )
२ मोठे चमचे डाळयाच पीठ.
(आयत्या वेळी डाळे मिळाले नाहीत तर, तव्यावर २ चमचे बेसन चांगल भाजुन घ्या. )
चीज
२ लहान चमचे शाहीजीर.
२ लहान चमचे लाल तिखट.
१ चमचा मसाला.
बारीक चिरलेली कोथिंबीर
चिमूटभर भगवा रंग (ऑपशनल)
मीठ.
१ चमचा बटर/लोणी.
कृती:
चिकन धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. टिप कागदावर थोडावेळ ठेवुन सार पाणी टिपुन कोरडे करा.
मग त्याला आल लसणाची पेस्ट आणि मीठ लावुन १०-१५ मिनिट फ्रिज मध्ये ठेवा.
एका भांड्यात दही, शहाजीर, चीज, मीठ, डाळ्याच पिठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन फेटुन घ्या.
तीन बाउलमध्ये वरील मिश्रण विभागुन घ्या. एकात लाल तिखट + मसाला + रंग, दुसर्यात हिरवी चटणी टाकुन परत फेटुन घ्या. तिसर तसच ठेवा.
दुसर्या दिवशी बांबुच्या सळया घेउन प्रत्येक सळी मध्ये ५-६ तुकडे खोचा.
मंद आचेवर बटर टाकुन ह्या शीगा तळुन घ्या.
तंदुर इफेक्टसाठी, प्रत्येक शीग शेगडीवर मोठ्या आचेवर ३० से़कंद भाजुन घ्यावी.
भारताचा तिरंगाच वाटतोय.. मस्तच झाले असणार
ReplyDeletehe oven madhe kelele chalel ka?
ReplyDeleteसुनिता ओव्हनमध्ये केल तर उत्तमच. :)
ReplyDeleteHow to cook in oven
ReplyDeleteओव्हन २५०°C वर 15 मिनिटं तापवुन मग ह्या शिगा २५-३० मिनिटे ठेवाव्या.
ReplyDeleteशेवटही ३-४ मिनिटं ग्रील-मोडवर ठेवल्यास खरपूस होतील.
काहीसं असं (http://kha-re-kha.blogspot.com/2011/01/blog-post_23.html)
Oh... thnx, actually my hubby is vegetarian so could u plz tell me same dish in veg
ReplyDeleteनमस्कार अर्चना,
ReplyDeleteव्हेज करायचं असेलं तर तुम्ही पनीर, मश्रुम्स, पांढरा कांदा, रंगीत भोपळी मिरची, बटाटे वापरू शकता.
Thanx Pratik,
ReplyDeleteI will try this and send you my husbands reply.
Fantastic kabab.Mouth watering and very tempting.Im definitely going to make this on sunday.Could you tell me which masala u added with the red chilli powder and color.
ReplyDeleteHi Ffiona,
ReplyDeleteI hv mailed you the link of Masala Recipe.