जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 27 December 2010

श्रिखंड

श्रिखंड न आवडणारा मराठी माणुस विरळाच.
आमच्या आंतरजालीय मित्रं श्री. सहजरावांनी आम्हाला ही श्रिखंडाची कृती दिली.

त्यामुळे या पाककृतीचे खरे श्रेय सहजरावांना. आम्ही फक्त निमित्तमात्र.



चांगले ताजे घट्ट दही घावे.



एका पंच्यात/ पतळ कपड्यात बांधून रात्र भर टांगून ठेवावे.




१ किलो दह्याचा सधारण अर्धा किलो चक्का होतो.




जेवढा चक्का तेवढीच साखर घ्यावी व ते एकत्र करुन परत रात्रभर फ्रीजमधे ठेवावे

मग बाहेर काढून छान घोटावे.
किंचीत दुधात केशराच्या दोन चार काड्या घालून रंग बनवावा. तो या मिश्रणात घालून श्रीखंडाला केशरी रंग आणवा.




मग आवडी नुसार चारोळ्या, बदाम , पिस्ते ,वेलदोडे कुटून पूड टाकुन सजवा.

No comments:

Post a Comment