सुरण १/४ किलो लहान तुकडेकरुन .
असल्यास पाती कांदा नाही तर १ लहान कांदा.
२ चमचे मक्याच पीठ
१ चमचा जीरेपुड.
१ चमचा लाल तीखट
२ मिरच्या बारीक चिरुन.
३-४ चमचे तांदळाच पीठ.
१ चमचा आल पेस्ट.
चिमुट भर हळद.
मीठ स्वादानुसार.
कृती:
१) आधी सुरण कुकरला लावुन उकडुन घ्या. उकडल्या नंतर चांगल कुस्करुन करुन वा खिसणीवर खिसुन घ्यावा.
२) त्यात वरील सर्व मसाले टाकुन चांगल एकजीव करा. त्याचे लहान लहान गोळे करा.
३) तेलात खरपुस तळुन घ्या. चटणी सॉस आणि गरमा गरम चहा सोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment