जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday, 27 December 2010

फ्राईड चिकन

साहित्य:
चिकनचे मोठ्या आकारचे तुकडे.
१ अंड.
१ कप दुध.
२ कप मैदा.
१ चमचा आल-लसुण पेस्ट.
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा लाळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.

कोलसॉ साठी:
१ गाजर, कोबी, मेयॉनिस, घट्ट दही, साखर, १ चमचा लिंबाचा रस/ व्हिनेगर.
गाजर किसुन घ्याव. कोबी बारीक चिरुन घ्यावा.
एका भांड्यात किसलेल गाजर कोबी आणि वरील साहित्य निट एकत्र करुन घ्याव.

कृती:



चिकन साफ करुन धुवुन त्याला टुथपिकने टोचे मारुन घ्यावे.




एका भांड्यात पाणि घेउन त्यात १/२ चमचा मीठ ताकुन चिकनचे तुकडे त्यात १/२ तास मुरत ठेवावे.



१/२ तासाने पाण्यातुन बाहेर काढुन पेपर नॅपकीनने/ स्वच्छ कपड्याने पुसुन घ्यावे.
त्याला आल-लसुण पेस्ट,लाल तिखट लावुन परत १०-१५ मिनिटं मुरत ठेवाव.




एका भांड्यात चवी नुसार मिठ टाकुन अंड फेटुन घ्याव. त्यात दुध टाकुन परत एकजीव करुन घ्याव.




दुसर्‍या भांड्यात मैदा, मीठ, काळीमिरी पुड एकत्र करुन घ्याव.


कढईत तेल तापवत ठेवाव. एकदम कडकडीत तापवुनये.
चिकनचा एक पीस आधी अंड्याच्या मिश्रणात घोळवुन मग पीठात घोळवावा.
मग परत अंड्याच्या मिश्रणात घोळवुन मग पीठात घोळवावा.
ही घोळवण्याची क्रिया ३-४ वेळा करावी.

मध्यम आचेवर सगळे तुकडे गोल्डन ब्राउन होइस्तो खरपुस तळुन घ्यावे.

कोलसॉ बरोबर सर्व्ह करावे.

No comments:

Post a Comment