कॉलेज मध्ये असताना मॅगीने वेड लावल होतं. (नाही हो SY मधली नाही, २ मिनिट्स वाल्या मॅगी न्युडल्स बद्दल बोलतोय.) आमच्या सोमय्याच्या कँपस मध्ये मधोमध एक मॅगी सेंटर होत.
२ रुपयाला कागदाच्या बशीत टिच भर गरमा गरम मॅगी मिळायची आणि जोडीला आसायची १ रुपयाची नेस्लेची गरमा गरम किंवा आईस कोल्ड गारे गार कॉफी.
आर्ट्स आणि कॉमर्सची पोर पोरी सदान कदा तिकडे पडिक आसायची.
नुसत थंडगार पाणीच आसायच ती कॉफी म्हणजे. रंगा पुरता दुध आणि कॉफी फक्त वासापुरती . पण कोल्ड कॉफीच वेड लागल ते तिथुनच.
गेल्याच आठवड्यात घरी केलेली ही कोल्ड कॉफी.
साहित्य :
फुल क्रिम दुध,
साखर,
कॉफी,
असल्यास कंडेन्स मिल्क,
बर्फ,
मिक्सर/शेकर.
आईसक्रिम. (व्हॅनिला, बनाना कुठल्याही चवीचं )
चॉकलेट.
कृती:
एका भांड्यात चॉकलेट वितळवुन घ्याव.
ज्या ग्लासमध्ये सर्व्ह करणार आसाल त्या ग्लास मध्ये वितळलेल्या चॉकलेटचे ओघळ सोडावे, आणि लगेच फ्रिज मध्ये ठेवावे.
मिक्सर मध्ये बर्फ क्रश (बारीक चुरा) करुन घ्यावा.
त्यात दुध्,साखर,आईसक्रिम,कॉफी,कंडेन्स मिल्क (असल्यास साखरेच प्रमाण कमी कराव) टाकुन चांगल फिरवुन घ्याव.
सर्व्ह करताना वरुन परत एक एक आईसक्रिम चा छोटा गोळा टाकावा.
No comments:
Post a Comment