जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 27 December 2010

गोभी मंचुरीयन

साहित्यः

१ कांदा लांब कापलेला.
१ भोपळी मिरची लांब उभी कापलेली.
२ हिरव्या मिरच्या बारीक कापुन.
३-४ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
पातीकांदा चिरुन (असल्यास).
फ्लॉवर लहान तुकडे करुन.
२ चमचे मैदा
२ चमचे कॉन फ्लॉवर
सोया सॉस, चीली सॉस, टोमॅटो सॉस.
चवी नुसार मीठ.
तळण्यासाठी तेल.
कृती:


एका भांड्यात पाणी तापवुन घ्यावे. उकळी आल्यावर गॅस बंद करुन मग त्यात कापलेला फ्लॉवर ५ मिनिटं टाकुन ठेवावा.
नंतर बाहेर काढुन वेगळा ठेवावा.





एका भांड्यात थोड तेल तापवुन त्यात लसुण हिरवी मिरची परतुन घ्यावी.





मग त्यात थोडा सोया सॉस, टोमॅटो सॉस, चीली सॉस टाकुन मोठ्या आचेवर परतुन घ्याव.





नंतर त्यात कांदा, पाती कांदा, भोपळी मिरची टाकुन परतुन घ्याव. चवीनुसार मीठ टाकाव. आच मध्यम करावी.





ज्या प्रमाणात ग्रेव्ही हवी त्या प्रमाणात पाणी टाकावे.
एक उकळी आली की मग त्यात १-२ चमचे कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन टाकावे.
१ मिनिटा नंतर आच बंद करावी.





एका भांड्यात २ चमचे मैदा, १ चमचा कॉन फ्लॉवर मीठ एकत्र करुन घ्यावे.





गरम पाण्यातुन बाहेर काढुन ठेवलेले फ्लॉवरचे तुकडे या मिश्रणात घोळवुन घ्यावे.
शक्यतो पाणी टाकु नये. अगदिच कोरड वाटल तर पाण्याचा एक हबका मारावा.





हे पिठात घोळवेलेले तुकडे गरम तेलात सोनेरी रंग येइस्तो खरपुस तळुन घ्यावे.




वाढायच्या काही क्षणांपुर्वी वर तयार केलेल्या ग्रेव्हीत हे तळलेले फ्लॉवर चे तुकडे आयत्यावेळी घालावे आणि गरमा गरम सर्व्ह कराव.

No comments:

Post a Comment