जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday, 27 December 2010

केळफुलाचे कबाब (वडे)

गेल्या विकांताला घरा मागच्या आवारात फेरफटका मारत असताना केळीच्या झाडांना लोंगर लागलेले दिसले. तेव्हाच इरादा पक्का केला की या आठवड्यात आईकरते तसे केळफुलाचे कबाब /डाळवडे करुन पहायचे.

लंच ब्रेक मध्ये घरी गेलो. चण्याची डाळ भिजत घातली. आणि एक बोंड (केळफुल) तोडुन आणल.
संध्याकाळी ऑफिस मधुन आल्यावर केळीच बोंड निसुन घेतल.
बाकिच्याही सामानाची जुळवाजुळव केली.
साहित्यः


१ बाउल चण्याची डाळ ३-४ तास भिजत ठेवलेली.
२/३ हिरव्या मिरच्या.
१ इंच आल.
२ पाकळ्या लसुण (आवडत असल्यास)


फोटोत दाखवल्या प्रमाणे , त्या जांभळ्या पाकळ्यांच्या आड ५-६ फुल असतात.
प्रत्यक फुलाच्या मध्ये ६ केसर असतात त्यातला एकच इतरांहुन वेगळा असतो तो कढुन टाकायचा आणि एक लहान पाकळी असते ती पण काढुन टाकायची.
जस जस जांभळ्या पाकळ्या कमी कमी होत जातात तस तस आतला गाभा पांढरा दिसायला लागतो. तो कोवळा असतो. तो आख्खा घेतला तरी चालतो.



केळफुल साफकरुन आणि बारीक चिरुन.



१ लहान कांदा, उभा आडवा चिरुन.
१ चमचा जीर.
१ चमचा लाल तिखट.
१/२ चमचा धणे पुड.
१/२ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
तळण्यासाठी तेल.


कृती:

सर्वप्रथम डाळ + मिरची + आल + लसुण मिक्सरमध्ये भरड वाटुन घ्याव.


मग एका मोठ्या भांड्यात हे मिश्रण आणि बाकीचे मसाले, कांदा सगळे एकत्र करुन घ्या.



लहान लहान गो़ळे करुन वडयांसारखा आकार द्या.

एका कढईत तेल गरम करुन त्यात हे कबाब खरपुस तळुन घ्या.

चटणी सॉस सोबत गरमा गरम सर्व्ह करा.


2 comments:

  1. Mastch.... pan kelful kaple ki te chikat nahi ka hot....?

    ReplyDelete
  2. केळफुला निसाताना हाताला थोडं तेल लावून घ्यावं.
    आणि कापल्या कापाल्या पाण्यात ठेवावं म्हणजे काळं पडत नाही.

    ReplyDelete