साहित्यः
१ भल मोठ्ठ वांग.
१ मध्यम कांदा बारीक चौकोनी कापुन.
२-४ चमचे भाजलेल्या दाण्याच कुट.
१-२ हिरव्या मिरच्या (ज्या प्रमाणात तिखट आवडत त्या नुसार) बारीक चिरुन.
१/२ चमचा हळद.
१ लहान चमचा लाल तिखट.
फोडणीसाठी राई , तेल.
मीठ चवीनुसार.
कृती:
वांग्याला काट्याने/टुथपीक ने टोचे मारुन घ्यावे.
वांग्याला तेलाच बोट लावुन ते गॅसवर मध्यम आचेवर चांगले भाजुन काढावे.
भाजलेले वांगे गार झाल्यावर त्याचे साल काढुन, त्याचा गर काढावा (मॅश करुन घावं.)
तेलावर मोहरीची , मिरचीची फोडणी करुन त्यातच कांदा परतुन घ्यावा.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात वांग्याचा गर, लाल तिखट हळद, दाण्याच कुट आणि चवी नुसार मीठ टाकुन एक ५-१० मिनिट परतुन घावं.
गरमागरम फुलक्यां सोबत लुफ्त घ्या.
No comments:
Post a Comment