जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday 26 December 2010

कोलंबी फ्राय

साहित्य :

१/२ किलो. कोलंबी साफ केलेली पण न सोललेली (कोतासकट.)
३/४ मोठे चेमचे आलं + लसुण + मिरची + कोथिंबीर पेस्ट (हिरवा मसाला).
१ चमचा हळद.
२ मोठे चेमचे मालवणी मसाला. (फिश् मसाला).
१ लहान चमचा जिरेपुड.
१ मोठ्ठं लिंबू.
४/५ चेमचे तेल.
चवीनुसार मीठ.
२-४ उकडलेली अंडी सजावटीसाठी.

कृती :
सर्व प्रथम कोलंबी साफ करुन घ्या. साफ करताना कोलंबीचे पाय आणि डोक्याचा (डोळ्या पर्यंतचा) भाग काढुन कोत तशीच राहु द्या.
कोलंबी स्वच्छ पाण्यात धुवून त्यात लिंबू पिळा.
हळद ,मसाला, हिरवा मसाला, जिरेपुड, मीठ लावुन चांगल तासभर मुरत ठेवा.

तासाभरा नंतर एका फ्राईंग पॅन मध्ये तेल टाकून गॅस वर मध्यम आचेवर कोलंबी तळुन घ्या. साधारण १० मिनीटात शिजते. जास्त वेळ ठेवु नका.

तळलेली कोलंबी एका डिश् मध्ये घेउन उकडलेल्या अंड्यानी सजवा.

Prons Fry

जेवणात साईड डिश म्हणुन तर आवडतेच पण अपेय पानाची आचमन करणार्‍यांना तोंडी लावणे म्हणुन खास आवडीचा पदार्थ.


Prons Fry1

2 comments:

  1. Hi Pratik, when you say " kolambi talun ghya" does that mean deep fry or shallow fry ?

    Nisha

    ReplyDelete
  2. निशा, कोलंबी शॅलो फ्राय करायची.

    ReplyDelete