ताज्या टायगर प्राँस् .
२ मोठे चमचे हिरव वाटण. (मिरची, आलं, लसुण, कोथिंबीर)
१/२ चमचा हळद.
१/२ लिंबाचा रस
१ मोठा चमचा मसाला.
मीठ.
सारणा साठी : १ वाटी नारळ, १ चमचा बडीशेप, १ मिरची, कोथिंबिर, असल्यास पुदिन्याची ७-८ पाने, १/४ चमचा साखर, मीठ.
वरील सर्व सारणाचे पदार्थ मिक्सर मध्ये वाटुन चटणी बनवुन ठेवा.
१) ओव्हन १५० डिग्री से. वर तापवत ठेवा.
२) वर सांगितल्या प्रमाणे कोलंबी साफ करुन घ्या. हिरव वाटण, मीठ, मसाला,हळद, लिंबाचा रस लावुन ठेवा.
बांबुच्या काड्या घेउन कोलंबीच्या डोक्या पासुन शेपटी पर्यंत खोचा. यामुळे शिजताना कोलंबी सरळच राहील.
३) कोलंबीच्या पाठिवर चीर देउन सारणा साठी जागा करुन घ्या.
४) सारण भरुन ३-४ कोलंब्या बांबुच्या काडिने आडव्या जोडुन घ्या. ओव्हनच्या ट्रेला बटरचा हात फिरवुन घ्या. ब्रश ने कोलंब्यांना पण बटर लावुन घ्या.
५) ट्रे ओवन मध्ये १०-१५ मिनिटे ठेवुन ग्रिल करुन घ्या. मध्येच परत एकदा बटरचा ब्रश फिरवा.
इथे अश्या ताज्या कोलंब्या पहायला देखील मिळत नाही.. पोटात दुखणार तुझ्या.. कधी येऊ खायला, सांग बर!
ReplyDeleteMasta idea!
ReplyDelete