जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday, 27 December 2010

चिकन साते

साहित्यः


चिकन ब्रेस्ट लांब उभे तुकडे करुनडार्क सोया सॉस.
स्वीट चीली सॉस.
टॉबॅस्को सॉस.
१/२ लहान चमचा कोल्हापुरी ठेचा (जास्त तिखट आवडणार्‍यांसाठी)
१लहान चमचा आल-लसुण पेस्ट
चवी नुसार मीठ.


कृती:वरील सर्व सॉस, मीठ, आल-लसुण पेस्ट आणि ठेचा चिकनला लावुन कमीत कमी २ तास मुरत ठेवावे.लांब काड्यांमध्ये मुरवलेले चिकनचे तुकडे अडकवावे. एका नॉन्स्टीक पॅन मध्ये १ लहान चमचा तेल तापवुन त्यावर हे चिकन दोन्ही बाजुंनी फ्राय करुन घ्यावे.
No comments:

Post a Comment