सुका मसाला
१ लहान चमचा काळीमीरी
१ लहान चमचा धने
१ लहान चमचा जिरे
१ इंच दालचिनी
३-४ लाल सुक्या मिरच्या
४-५ लवंगा
१/२ वाटी सुक खोबरं
१/२ किलो चिकन. (मध्यम आकारचे तुकडे करुन)
१ मोठ्ठा कांदा (मध्यम चौकोनी) चिरुन.
१ टोमॅटो बारीक चिरुन.
२-३ कढिपत्याची पाने.
२ चमचे आल-लसुण पेस्ट.
मीठ - लाल तिखट चवी प्रमाणे.
कृती :
सर्व प्रथम तव्यावर खडा मसाला मध्यम आचेवर भाजुन घ्यावा.
सुके खोबरं पण मंद आचेवर भाजुन घ्यावे.
हे भाजलेले जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमध्ये कोरडेच (पाणी न टाकता) वाटुन घ्यावे. सुक्या खोबर्याचे थोडे तेल सुटते.
एका फ्राइंग पॅन मध्ये २ चमचे तेल तापवुन त्यात कढीपत्याची पाने टाकावीत. त्यांच तडतडण संपल्यावर त्यात कांदा टाकुन परतुन घ्यावा.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो टाकुन परत परतावं.
नंतर त्यात वाटलेला सुका मसाला, आल-लसणाची पेस्ट, लाल तिखट आणि चवीनुसार मिठ टाकुन चांगल परतुन घ्याव.
मसाला बाजुने तेल सोडायला लागला की त्यात चिकनचे तुकडे टाकुन नीट वर खाली करुन सगळा मसाला त्यातुकड्यांना लावुन घ्यावा.
वर झाकण ठेवुन (१०-१५ मिनिटं) मध्यम आचेवर एक दणदणीत वाफ काढावी. शक्यतो पाणी टाकु नये. चिकनच पाणी सुटतं.
तर अस हे गरमा गरम झणझणीत चिकन चेट्टीनाड आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत मिटक्या मारत खावं.
मी करून पहिले रे.. मस्तच झाले होते.. नवरोबा खूश..
ReplyDelete