जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 21 March 2011

चायनीज फ्राईड राईस.

साहित्य :

मोकळा शिजवलेला भात.



सिमला मिर्ची.
गाजराचे ज्युलियन्स..
फरसबी लांब उभी चिरलेली.
कोबी लांब उभा चिरलेला.
पातीचा कांदा.
हिरवी मिरची बारिक चिरलेली आवडी नुसार.
१ इंच आल्याचे ज्युलियन्स.



बोनलेस चिकन लहान तुकडे करुन.
१ लहान चमचा आलं-लसुण पेस्ट.
१/२ चमचा काळीमीरी पुड.
१ अंड.
सोया सॉस.
मीठ चवी नुसार.

कृती :

चिकनला आल-लसुण पेस्ट, काळीमिरीपुड, सोयासॉस आणि किंचित मीठ आवुन १०-१५ मिनिटं मुरत ठेवावं.




कढईत थोड्या तेलावर चिकन १०-१५ मिनिटं शिजवुन घ्यावं.



चिकन बाजुला काढुन त्याच कढीईत २ चमचे तेलावर आलं लसुण आणि हिरवी मिरची परतुन घ्यावी.
आच मोठी करुन त्यात वरील सर्व भाज्या २ मिनिटं परतुन घ्याव्या.



१ अंडे फेटुन टाकावे. आणि चांगल एकत्र करुन घ्यावं. शिजवलेले चिकन चे तुकडे टाकावे.
थोडा सोयासॉस टाकुन त्यात मोकळा शिजवलेला भात टाकावा आणि चांगल एकत्र कराव. मीठाचा अंदाज घेउन चवी नुसार मीठ टाकवं.