जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 27 December 2010

प्रियजनांसाठी सर्प्राईज्

उद्या लेक आणि तिची आई (सौ) येतायत.. म्हटल त्यांच्या स्वगता साठी काही तरी खास करुया.


So this is for your loved ones.

साहित्यः
कुंडीच्या आकाराचे कप. स्ट्रॉ.

मावा केक.

काळ्या / चॉकलेटी रंगाची बिस्कीटे. (मिक्सर मध्ये बारीक चुरा करुन)

आइसक्रिम.
गमी वर्म्स (ऑपशनल).
सजावटीसाठी फुलं

कृती:

१) मावाकेकचे गोलाकार तुकडे करुन कपच्या तळाशी ठेवावे.

२) कपच्या मधोमध, कपच्या उंचीचा स्ट्रॉ केक मध्ये उभा खोचा.

३) स्ट्रॉ च्या भोवतीने हव्या आसलेल्या चवीचे (फ्लेवरचे) आइस्क्रिम टाका.

४) गमी वर्म्स वरुन पसरा.

५) वरुन बिस्किटाच्या चुर्‍याचा थर लावा. फ्रिजर मध्ये ठेवा.

६) सर्व्ह करताना स्ट्रॉ मध्ये फुल अडकवुन द्या.

No comments:

Post a Comment