जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 27 December 2010

ओनियन उत्तप्पा

साहित्यः

पीठासाठी दोनास एक या प्रमाणात तांदुळ आणि उडिद डाळ कमीत कमी ४-५ तास भिजत ठेवावे.
(उपलब्ध असल्यास साध्या तांदळा ऐवजी उकडा तांदुळ घ्यावा.)
१ वाटी शिळा भात. ( असल्यास)
१/२ छोटा चमचा यीस्ट्/इनो


कांदा,टोमॅट,भोपळी मिरची, हिरवी मिरची बारीक चिरुन.
चवीनुसार मीठ.

कृती:

४-५ तास भिजत ठेवलेले तांदुळ आणि उडिद डाळ वेग वेगळे वाटुन घ्या.
शिळा भात असल्यास तो पण मिक्सर मध्ये वाटुन घ्या. एका मोठ्या भांड्यात एकत्र कराव.
घरात यीस्ट् नसल्यास १/२ छोटा चमचा इनो टाकुन मिश्रण चांगले ढवळुन घ्याव.
भांड्यावर झाकण ठेवुन भांड जरा उबदार जागेत रात्र भर ठेवाव.
थंडीत पिठ चढत/फुलत नाही आश्यावेळी रात्रीच ओव्हन २-३ मिनिटांसाठी गरम करुन हे भांड त्यात ठेवाव.
ओव्हन नसेल तर, तवा १-२ मिनिटांसाठी गरम करुन हे भांड त्यावर ठेवा.



दुसर्‍या दिवशी हे अस दाम दुप्प्टीने वर येईल.

पीठात चवीनुसार मीठ टाका.



उतप्पा टाकताना आधी नॉनस्टीकचा तवा चांगला तापवुन घ्या. थोड पाणी शिंपडुन चुर्रर्रर्रर्रर्रर्र..आवाज आल्यावर त्यावर डावाने पीठ टाकुन थोड पसरवुन घ्याव.



बाजुने थोड तेल सोडुन १/२ मिनिट वर झाकण ठेवाव. झाकण काढुन मग वरुन कांदा, हिरव्या मिरच्या टाकुन परत झकुन ठेवा.


एक दिड मिनिटाने उतप्पा वरुन शिजल्यावर (जाळी पडेल). उलथण्याने उलटुन बाजुने तेल सोडावे. १-२ मिनटे खरपुस शिजु द्यावे.



हिरव्या चटणी सॉस सोबत वाढा.



थोडा बदल म्हणुन पुढच्या खेपेस कांद्या सोबतच भोपळी मिरची, टोमॅटो टाकुन ट्राय करा.



No comments:

Post a Comment