साहित्यः
न्युडल्स .१ गाजराचे ज्युलियन्स.
१०-१२ फरसबी लांब-लांब उभी चिरुन
१ भोपळी मिरचीचे ज्युलियन्स.
१५० ग्रॅम कोबी लांब लांब उभा चिरुन
३-४पाती कांदे लांब लांब चिरुन.
१ इंच आल्याचे ज्युलियन्स.
३-४ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१-२ हिरव्या मिरच्या लहान चिरुन.
चिकन.
सोयासॉस
मीठ चवीनुसार
कृती:
एका भांड्यात पाणी घेउन त्या चिकनचे मोठे तुकडे उकडण्यासाठी ठेवावे. १५-२० मिनिटानी पाणी गाळुन बाजुस ठेवावे.
(हा चिकन स्टॉक सुप बनवण्यासाठी वापरावा)
चिकनचे हव्या त्या आकारचे तुकडे करुन घ्यावे.
चिकन शिजतय तोवर दुसर्या भांड्यात पाणी घेउन न्युडल्स शिजवत ठेवाव्या.
शिजताना त्यात १ चमचा तेल टाकावे.
साधारण १०-१५ मिनिटांनंतर चाळणीने पाणी गाळुन न्युडल्स ताबडतोब थंड पाण्यात टाकाव्या. आणि परत गाळुन घ्याव्या.
एका ताटात पसरुन काही बर्फाचे तुकडे टाकावे.
एका मोठ्या भांड्यत तेल घेउन त्यात मिरची आल लसुण परतुन घ्यावे.
१-२ चमचे सोयासॉस टाकुन मग सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर १-२ मिनीट परतवुन घ्याव्या.
पुर्णपणे शिजवु नये. क्रंची ठेवाव्या. चिकनचे तुकडे टाकावे. चवीनुसार मीठ ताकुन परतावे.
थंड झालेया न्युडलस टाकुन नीट एकत्र करुन घाव.
गरमा गरम सर्व्ह कराव.
No comments:
Post a Comment