परवाच एका मॉल मध्ये फिरताना फुड्कोर्ट्मध्ये एक माणुस डोसा बनवताना दिसला. मुळातच इकडे भारतीय हॉटेलस मोजुन ३-४. एकजात सगळी सारखीच उत्तरेकडची चव असलेली. त्यामुळे तो डोसे काढणारा पाहुन बर वाटलं. पण वर नाव वाचल तर 'ईटालियन क्रेपे'. म्हटलं हा काय प्रकार आहे. त्याच्या काउंटरवर गेलो. एक क्रेपे ऑर्डर केला. थोडास गोडुस लागला. दिसायला तर एकदम डोश्या सारखा होता. मग घरी आल्यावर नेट वर धुंडाळलं. तेव्हा क्रेपे हा न्यहारीसाठी किंवा मधल्या वेळच्या खाण्यासाठी चालुन जाणारा , एक युरोपियन डोश्याचा प्रकार आहे अस कळलं. आणि थोडे फेर फार करत हा प्रयोग कराण्यासाठी हात शीवशीऊ लागले . ;)
साहित्यः
३/४ बाऊल मैदा/गव्हाच पीठ.
१ अंड.
१/२ कप दुध.
सोडा (पिण्याचा. तोच जो मोठी माणस कसल्याश्या रंगीत द्रव्यात टाकुन घेतात तो.)
मीठ चवीनुसार.
१ चमचा साखर्/पीठी साखर
येवढ्या प्रमाणात ५-६ क्रेपे तयार होतात.
नॉन्व्हेज स्ट्फिंगसाठी : चिकन
व्हेज स्ट्फिंगसाठी : मश्रुम (वा तुम्हाला आडतील त्या भाज्या.)
गोड स्ट्फिंगसाठी : फळांचा जॅम, मुरंबा.
बाकी तुमच्या तेब्येतीला मानवत असल्यास चीज् ,बटर.
कृती:
एका भांड्यात अंडे फेटुन घावे. त्यात मैदा, मीठ, साखर घालुन एकजीव करुन घ्यावं.
नंतर त्यात सोडा टाकुन साधारण डोश्याच्या पीठा पेक्षा थोड पातळ मिश्रण तयार करावं.
किमन १०-१५ मिनिटे बाजुला ठेउन द्यावं
ते मिश्रण आराम करतय तो वर स्टफिंगची तयारी करावी.
१ चमचा तेलावर, मश्रुम आणि बोनलेस चिकनचे छोटे तुकडे करुन त्यांना मीठ, मसाला, हळद, हिरव वाटणं लावुन मधम आचेवर १० मिनिटं परतुन घावे.
कडकडीत तापलेल्या तव्यावर एक डाव पीठ ओतुन तवा सगळ्या बाजुंनी फिरवुन घ्यावा जेणे करुन मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरेल. आच मध्यम करुन १-२ मिनिटे शिजु द्यावं
कडा सुटायला लागल्या की उलथण्याने उलटुन दुसरी बाजू पण १-२ मिनिटे शिजु द्यावी.
ज्याच्या त्याच्या आवडी नुसार त्यात हवं ते स्टफिंग टाकुन रोल करावे.
गोड आवडणार्यांनी बटर लावुन जॅम, मुरांब्याचा थर द्यावा.
नॉन्व्हेज प्रेमींनी मॅगी चा भुना मसाला / झण्झणीत चटणी चा कोट करुन त्यावर चिकन्/भाज्या टाकुन रोल करावा.
हा पदार्थ गरमागरम खाण्यातच मजा आहे. :)
मित्रा तोडलस...अप्रतिम ब्लॉग. खूप खूप आवडला.
ReplyDeleteमी नक्कीच करून बघेन एक एक पदार्थ. शुभेच्छा. खात रहा :)
धन्स सुहास. नक्की करुन बघ आणि कसा झाला ते कळव मला :)
ReplyDeleteनविनच प्रकार दिसतोय.. करुन पहायला हवा..
ReplyDeleteअगं आई ग्ं..एका पेक्षा एक भन्नाट पाककृती...मला हा प्रकार बनवायला हमखास आवडेल...लवकरच विल ट्राय धिस..
ReplyDelete