जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday 28 December 2010

चिकन चीझ रोल

साहित्य:


१ चिकन ब्रेस्ट.
मेयॉनिज.
मस्टर्ड सॉस.
अस्स्ल वर्‍हाडी ठेचा (नसल्यास चिली सॉस)
गार्लीक सॉस.
चीझ च्या चकत्या. (स्लाइस)
मैदा.
१ अंड फेटुन.
ब्रेड चा चुरा.
मीठ चवी नुसार.
तेल तळण्यासाठी.

कृती:



धार धार सुरीने एका चिकनच्या ब्रेस्टचे वर दाखवल्या प्रमाणे ३ पातळ पदर काढुन घ्या.



त्यावर थोड मीठ भुरभुरुन मग त्यावर बटर लावायच्या सुरीने अलगद अलगद हाताने मेयॉनिज लावुन घ्या.



मग त्यावर थोडा मस्टर्ड सॉस लावुन घ्या.



नंतर तिखट ठेचा/ चीली सॉस चा थर द्या.



आवडत असल्यास एक हात गार्लीक सॉसचा लावा.



त्यावर चीझ ची चकती अर्धी कापुन ठेवा.



अलगद हाताने पण घट्ट रोल करा.



रोल सुटु नये म्हणुन टुथपिक ने बंद केल तरी चालेल.
या रोलवर थोडा मैदा शिंपडा.



प्रत्येक रोल फेटलेल्या अंड्यात घोळवुन मग ब्रेडच्या चुर्‍यात घोळवुन घ्या.



ब्रेडच्या चुर्‍यात घोळवलेले रोल १५-२० मिनीट फ्रिज मध्ये ठेवावे.
नंतर तेलात मध्यम आचेवर १०-१२ मिनिटे सोनेरी होइस्तव तळुन घावे.


2 comments: