जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday 26 December 2010

तिरंगा मलई कबाब

तिरंगा मलई कबाब, नावातच सार काही आल. एक एक तुकडा तोंडात जाताच विरघळतो. मला बर्‍यापैकी जमणार्‍या पाककृतीं पैकी एक. कबाबची पुर्वतयारी आदल्या दिवशीच करुन ठेवली तर चिकन व्यवस्थीत मुरतं आणि कबाब मऊ पण होतात.

लागणार साहित्य:
१/२ किलो बोनलेस चिकन.
ताज दही १ ते १,१/२ वाटी.
२ मोठे चमचे आलं-लसणाची पेस्ट.
हिरवी चटणी (पुदिना + मिरची +कोथिंबीर )
२ मोठे चमचे डाळयाच पीठ.
(आयत्या वेळी डाळे मिळाले नाहीत तर, तव्यावर २ चमचे बेसन चांगल भाजुन घ्या. )
चीज
२ लहान चमचे शाहीजीर.
२ लहान चमचे लाल तिखट.
१ चमचा मसाला.
बारीक चिरलेली कोथिंबीर
चिमूटभर भगवा रंग (ऑपशनल)
मीठ.
१ चमचा बटर/लोणी.

कृती:

चिकन धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. टिप कागदावर थोडावेळ ठेवुन सार पाणी टिपुन कोरडे करा.
मग त्याला आल लसणाची पेस्ट आणि मीठ लावुन १०-१५ मिनिट फ्रिज मध्ये ठेवा.

एका भांड्यात दही, शहाजीर, चीज, मीठ, डाळ्याच पिठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकुन फेटुन घ्या.

तीन बाउलमध्ये वरील मिश्रण विभागुन घ्या. एकात लाल तिखट + मसाला + रंग, दुसर्‍यात हिरवी चटणी टाकुन परत फेटुन घ्या. तिसर तसच ठेवा.

चिकनचे ३ भाग करुन वरील ३ बाउलमध्ये टाका. चांगल मिक्स करुन झाकुन फ्रिजमध्ये रात्र भर ठेवुन द्या. (फ्रिजर मध्ये नाही.)


दुसर्‍या दिवशी बांबुच्या सळया घेउन प्रत्येक सळी मध्ये ५-६ तुकडे खोचा.


मंद आचेवर बटर टाकुन ह्या शीगा तळुन घ्या.


तंदुर इफेक्टसाठी, प्रत्येक शीग शेगडीवर मोठ्या आचेवर ३० से़कंद भाजुन घ्यावी.


10 comments:

  1. भारताचा तिरंगाच वाटतोय.. मस्तच झाले असणार

    ReplyDelete
  2. सुनिता ओव्हनमध्ये केल तर उत्तमच. :)

    ReplyDelete
  3. ओव्हन २५०°C वर 15 मिनिटं तापवुन मग ह्या शिगा २५-३० मिनिटे ठेवाव्या.
    शेवटही ३-४ मिनिटं ग्रील-मोडवर ठेवल्यास खरपूस होतील.
    काहीसं असं (http://kha-re-kha.blogspot.com/2011/01/blog-post_23.html)

    ReplyDelete
  4. Oh... thnx, actually my hubby is vegetarian so could u plz tell me same dish in veg

    ReplyDelete
  5. नमस्कार अर्चना,
    व्हेज करायचं असेलं तर तुम्ही पनीर, मश्रुम्स, पांढरा कांदा, रंगीत भोपळी मिरची, बटाटे वापरू शकता.

    ReplyDelete
  6. Thanx Pratik,
    I will try this and send you my husbands reply.

    ReplyDelete
  7. Fantastic kabab.Mouth watering and very tempting.Im definitely going to make this on sunday.Could you tell me which masala u added with the red chilli powder and color.

    ReplyDelete
  8. Hi Ffiona,
    I hv mailed you the link of Masala Recipe.

    ReplyDelete