जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday, 28 December 2010

चिकन चिली

साहित्य:


बोनलेस चिकन लांबट उभे तुकडे करुन.
१ मध्यम आकारचा कांदा उभा चिरुन.
१ मोठी भोपळी मिरची लांब चिरलेली.
२-३ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१/२ इंच आल बारीक चिरुन.
१ मोठा चमचा मैदा.
१ मोठा चमचा आलं लसुण पेस्ट.
१ चमचा काष्मिरी लाल तिखट
१ चमचा टॉमेटो पेस्ट.
१/२ चमचा हळद.
२-३ चमचे सोया सॉस.
मीठ चवीनुसार.
तेल.
कृती:मैदा, आलं-लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद,सोयासॉस, मीठ आणि टॉमेटो पेस्ट एकत्र करुन घावं आणि ते चिकन च्या तुकड्यांना लावुन १० मिनिट फ्रिजर मध्ये ठेवावं.

पॅन मध्ये थोड्या तेलावर कांदा गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.
मग त्यात आलं लसणाचे तुकडे टाकुन १ मिनिट परताव.
आच मोठी करुन मग त्यात मुरवलेले चिकनचे तुकडे घालुन १०-१२ मिनिटं परतत रहावं.चिकन चिजल्यावर त्यात भोपळी मिरची टाकुन २-३ मिनिटं मोठ्या आचेवर परतत रहावं.No comments:

Post a Comment