जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 26 December 2010

सुरणाचे वडे

साहित्य :

सुरण १/४ किलो लहान तुकडेकरुन .
असल्यास पाती कांदा नाही तर १ लहान कांदा.
२ चमचे मक्याच पीठ
१ चमचा जीरेपुड.
१ चमचा लाल तीखट
२ मिरच्या बारीक चिरुन.
३-४ चमचे तांदळाच पीठ.
१ चमचा आल पेस्ट.
चिमुट भर हळद.
मीठ स्वादानुसार.


कृती:
१) आधी सुरण कुकरला लावुन उकडुन घ्या. उकडल्या नंतर चांगल कुस्करुन करुन वा खिसणीवर खिसुन घ्यावा.२) त्यात वरील सर्व मसाले टाकुन चांगल एकजीव करा. त्याचे लहान लहान गोळे करा.३) तेलात खरपुस तळुन घ्या. चटणी सॉस आणि गरमा गरम चहा सोबत सर्व्ह करा.
No comments:

Post a Comment