जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday, 27 December 2010

पंजाबी समोसा

चला मंडळी चहाची चेळ झालीये. वाफाळणार्‍या चहा सोबत मस्त गरमा गरम समोसे हाणु.

साहित्यः


३-४ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन, थोडेसे कुस्करुन.
१/२ वाटी हिरवे वाटाणे /मटार. (जर हिरवे कडक वाटाणे असतील तर ते पण ऊकडुन घ्या.)

१ चमचा आल-लसणाची पेस्ट.
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा धणे पुड.
१ चमचा जिरे पुड.
१ चमचा गरम मसाला.
१/२ चमचा हळद.
१ चमचा जिरं.
१ चमचा शहाजिरं.
१ चमचा धणे.
१ चमचा आमचुर.
मीठ चवीनुसार.
१-२ वाट्या मैदा.
तळण्यासाठी तेल.
कृती:एका भांड्यात २ चमचे तेल तापवुन त्यात जिर्‍याची फोडणी करावी.
कुस्करलेले बटाटे, वाटाणे आणि वरील सगळे मसाले टाकुन सारण परतुन घ्या.एक वाफ काढुन सारण आचे वरुन उतरवा.मैद्यात गरजे नुसार मोहन(तापवलेले तेल), मीठ, शहाजिरं,पाणी टाकुन पीठ मळुन घ्या. १५-२० मिनीट झाकुन ठेवा.पिठाचा एक छोटा गोळा घेउन थोडी लंबगोलाकार पुरी लाटुन घ्या.
आणि सुरीने तिचे दोन भाग करा.सर्व कडांना पाणी लावुन कोनच्या आकारात वाळुन घ्या.आत सारण भरुन समोस्याच्या कडा पण पाणी लावुन सीलबंद करा.
कढईत समोसे बुडतील इतपत तेल घेउन मध्यम आचेवर खरपुस तळुन घ्या.

No comments:

Post a Comment