जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Saturday 13 July 2013

पेरी-पेरी (बटरफ्लाय) चिकन


ईथे बाहेर मस्त धो धो पाऊस कोसळतोय. काही तरी झणझणीत चापायची इच्छा होतेय.
आज फार दिवसांनी मुड ही लागलाय. (त्यात आम्ही वार पाळत नसल्याने आम्हाला एक संकष्टी सोडली तर सगळे दिवस सारखेच.) त्यामुळे आमचा शनीवार वैगरे काही नाही.

काय मग करायची का सुरवात?

पेरी पेरी सॉस
साहित्यःलाल मिरच्या (मिरच्यांची संख्या त्यांच्या तिखटपणाच्या तीव्रतेवर अवलंबून.)
मी habanero peppers वापरल्यात.
एक लहान कांदा.
एक गड्डा लसुण.
एका लिंबाचा रस.
२ लहान चमचे काळीमीरी पुड
३ मोठे चमचे पेपरीका (नसल्यास काश्मीरी लालतिखट) याने रंग चांगला येतो.
१/२ कप व्हिनेगर.
१/२ लहान चमचा साखर (ऑप्शनल. व्हिनेगरचा उग्रपणा कमी करण्यासाठी.)
१/२ कप तेल. (ऑलिव्हच असल्यास उत्तम)
चवी नुसार मीठ.

कृती :मी वापरलेल्या मिरच्या अतीजहाल असल्यामुळे त्यांचा तिखटपणा थोडा कमी करण्यासाठी व एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी या मिरच्या शेगडीवर भाजुन आणि नंतर सोलून घेतल्या.

..

(कांद्याचा कच्चटपणा घालण्यासाठी कांदा थोडा परतुन घेतला होता.)
सॉससाठी म्हणुन लागणारे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये वाटुन घेतले.

.

तयार सॉस बाटलीत बंद करुन फ्रीजमध्ये ठेवल्यास ४-५ आठवडे सहज टिकतो.
शक्य असल्यास हा सॉस आदल्या दिवशी करुन ठेवावा. मुरल्यावर याची चव अधीक खुलते.
कोंबडी स्वच्छ धुवून घेतली. तिच्या पाठीच्या कण्याकडचा भाग खालील चित्रफितीमध्ये दाखवल्या प्रमाणे कापून टाकला. (सुपसाठी स्टॉक बनवायचा असल्यास याचा काढुन टाकलेल्या भागाचा वापर करता येईल.)


चिकन ब्रेस्टमध्ये असणारं हाड/कुर्चा काढुन टाकल्यास चिकन एकदम फ्लॅट होतं.


..कोंबडीला चरे देऊन चवी नुसार मीठ भुरभुरलं. तयार असलेला पेरी-पेरी सॉस लावून किमान ३-४ तास मुरत ठेवलं.

..

ओव्हन १० मिनिटं २००°C वर प्रीहिट करुन घेतला. आणि नंतर मुरवलेली कोंबडी आत अंदाजे ६०-८० मिनीटं शिजत ठेवली. (कोंबडीच्या आकारावर शिजण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त करावा.)

.

चियर्स.

Tuesday 1 January 2013

पेठा

समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवंवर्षाच्या शुभेच्छा !!!


साहित्य :


  
१/२ ते ३/४ किलो कोहळं (अ‍ॅशगार्ड)
१/२ किलो साखर.
१-२ चमचे खायचा चुना.
तुरटी.
गुलाब/केवडा वॉटर. 

कृती :


 

कोहळं सोलुन आतल्या बीया आणि स्पंजी भाग काढुन टाकावा आणि एक ते दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे.
या तुकड्यांना काट्याने / टुथपीकने सर्व बाजुंनी टोचे मारुन घ्यावे.चुना पाण्यात मिसळुन त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे. 
कपभर पाण्यात तुरटीही विरघळुन घ्यावी.

दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवुन घ्यावे.


  

एका भांड्यात भरपुर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शीजत ठेवावे.     
कोहळं शिजल्यावर चाळणीत काढुन बाजुला ठेवावे.
एका भांड्यात मंद आचेवर साखर भीजेल इतपत पाणी टाकुन उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे.
मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल्) तयात होऊ लागतील. 
आच थोडी मंदावून अजुन थोडावेळ परतत रहावं.
 एखाद्या ताटात हे तुकडे काढुन वरून जाळी ठेउन किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे.  
(झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये. :) ) 
पुर्ण पणे थंड झाल्यावर वाटल्यास वरुन गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे. 

दोन तासांच्या मेहनती नंतर आनि एकुण ८ तासंच्या प्रतिक्षे नंतर तुमच्या श्रमाचं गोड फळ तायार असेल........
हे असं.