जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Tuesday, 1 January 2013

पेठा

समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवंवर्षाच्या शुभेच्छा !!!


साहित्य :


  
१/२ ते ३/४ किलो कोहळं (अ‍ॅशगार्ड)
१/२ किलो साखर.
१-२ चमचे खायचा चुना.
तुरटी.
गुलाब/केवडा वॉटर. 

कृती :


 

कोहळं सोलुन आतल्या बीया आणि स्पंजी भाग काढुन टाकावा आणि एक ते दिड इंचाचे तुकडे करुन घ्यावे.
या तुकड्यांना काट्याने / टुथपीकने सर्व बाजुंनी टोचे मारुन घ्यावे.चुना पाण्यात मिसळुन त्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे किमान २-३ तास मुरत ठेवावे. 
कपभर पाण्यात तुरटीही विरघळुन घ्यावी.

दोन-तीन तासांनी कोहळ्याचे तुकडे ३-४ वेळा स्वच्छ पाण्यातुन धुवून घ्यावे. परत एकदा तुरटीच्या पाण्याने धुवुन घ्यावे.


 

एका भांड्यात भरपुर पाणी घेउन हे तुकडे मध्यम आचेवर अंदाजे तासभर शीजत ठेवावे.   
कोहळं शिजल्यावर चाळणीत काढुन बाजुला ठेवावे.
एका भांड्यात मंद आचेवर साखर भीजेल इतपत पाणी टाकुन उकळी आणावी. पाकाला उकळी आल्यावर त्यात कोहळ्याचे तुकडे अलगद सोडावे.
मध्यम आचेवर कोहळ्याचे तुकडे पाकात परतत रहावे. साधारण अर्ध्या तासात साखरेचे स्फटिक (क्रिस्टस्ल्) तयात होऊ लागतील. 
आच थोडी मंदावून अजुन थोडावेळ परतत रहावं.
 एखाद्या ताटात हे तुकडे काढुन वरून जाळी ठेउन किमान ३-४ चार तास थंड करत ठेवावे. 
(झटपट थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊ नये. :) ) 
पुर्ण पणे थंड झाल्यावर वाटल्यास वरुन गुलाबपाणी वा केवड्याचे पाणी शिंपडावे. 

दोन तासांच्या मेहनती नंतर आनि एकुण ८ तासंच्या प्रतिक्षे नंतर तुमच्या श्रमाचं गोड फळ तायार असेल........
हे असं.


 

 

7 comments:

 1. Ekadam Best... vadilanna kohal anayala sangatoy aata.. :)

  ReplyDelete
 2. AFAAT! Asa kontaa padaarth aahe jo tu karun pahilaa nahiyes? :) Graet!

  ReplyDelete
 3. धन्स गो तायडे. :)
  आका धन्स. :)

  ReplyDelete
 4. गणपाशेठ,
  तुमच्या सुचनाबरहुकूम पेठा बनवायला घेतलाय. अशिर्वाद असुद्या

  ReplyDelete
 5. कसा झाला होता कळव रे नक्की.
  तसा माझ्या पहिल्या प्रयत्नात पार पोपट झाला होता. ;)

  ReplyDelete
 6. गणपाशेठ,
  झाला एकदाचा पेठा. अगदी विकत मिळतो तसा नाही झाला, पण पहिल्या प्रयत्नाच्या मानाने खुपच चांगला झाला आहे.
  थोडा मऊ झालाय.
  काही प्रश्नः
  चुन्यात का भिजवून ठेवायचा?
  खाल्ल्यावर तोंडात एक प्रकारची स्टार्ची चव जाणवते ती घालवायला काय करू?
  जास्त शिजल्यामुळे मऊ झाला असेल का?

  बाकी सगळ्यात आवडता पदार्थ इतक्या सोप्या रितीने करता आल्याचे समाधान नक्कीच आहे. आणि त्याबद्दल तू धन्यवादास पात्र आहेस!

  ReplyDelete
 7. चला पहिल्याच प्रयत्नात माझ्या सारखा सप्तरंगी पोपट नाही झाला हे महत्वाचे. :)
  चुन्याबद्दल मलाही प्रश्न पडला आहे. जालावरही बराच शोधलं पण कुठे कारणं दिसलं नाही आता त्यासाठी एखादा हलवाईच पकडायला हवा.
  बरेच जण चुन्याच्या पाण्यात भिजवलेले (आणि नंतर स्वच्छ धूवून घेतलेले) कोहळ्याचे तुकडे सरळ साखरेच्या पाकातच शिवून घेतात. या प्रकारात खरतर स्टार्च जाणवला जात असावा. मी वर जीपद्धत दिलई आहे त्यात कोहळ आधी शिजवून घेतलंय, में बी शिजवल्यावर परत एकदा स्वच्छ धुवून घेतलं असत तर स्टार्चीनेस जाणवला नसता.

  ReplyDelete