जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Friday 22 November 2019

बटर गार्लिक प्राँस


  

 साहित्य :

1 लसुण बारीक चिरून
1½ इंच आलं बारीक चिरून
1 चमचा चिली फलेक्स
1-2 चमचे ड्राय हर्बस्
2 चीज क्युब/ सालाईस
1-2 चमचे सोया साॅस
1 मोठी वाटी फुल क्रीम/ साय
बटर/लोणी चवीनुसार मीठ.

 

आवडत असल्यास मश्रुमचे काप करून. स्वच्छ केलेली ताजी कोलंबी.

कृती :
 


 

कोलंबीला लसुण आलं सोयासॅस चिलीफ्लेक्स लावून 15 मि. मुरत ठेवावं.पॅन तापवून त्यात बटर टाकून त्यात लसुण आणि आल्याचे तुकडे खरपुस परतुन घ्यावेत. मुरवलेली कोलंबी मोठ्या आचेवर एक दिड मिनीट परतुन लगेच बाहेर काढावी.आता त्याच पॅनमधे राहीलेल्या बटरवर मश्रुमचे तुकडे मध्यम आचेवर (2-3 मि.) शिजवू घ्यावे. चवीनुसार मीठ टाकावं. मश्रुम शिजले की त्यात क्रीम, चीज, राहिलेले फ्लेक्स, हर्बज् टाकून त्याचा साॅस करावा.त्यातच शिजवुन बाजुला ठेवलेली कोलंबी टाकुन सगळं नीट एकत्र करावं.


पास्ता न्युडल्स आवडत असतील तर ते वेगळे शिजवून यात टाकू शकतो, किंवा हे असच लच्छा पराठा किंवा अगदी पोळीसोबतही छान लागतं.Wednesday 20 November 2019

भरली पापलेट


साहित्य :

सारणासाठी


½ कवड नारळ.                                   
4-5 हिरव्या मिरच्या
1 वाटी कोथिंबीर 
½ लिंबू
1 चमचा जिरे पुड
1 लहान कांदा बारीक चिरूनताजी पापलेट. 
चमचे हिरवे वाटण. (मिरची + आलं + लसुण + कोथिंबीर)
चवीनुसार मीठ
1 चमचा हळद, मसाला
रवा / तांदळाचं पीठ
तळणीसाठी तेल.


कृती :
सारणासाठी कोथिंबीर, मिरच्या, नारळ यांचे बारीक तुकडे करून वाटून घ्यावं. त्यात अर्ध लिंबू पिळावं.
पॅनमधे दोन चमचे तेलावर कांदा परतुन त्यात जिरेपुढ घालावी. कांदा गुलाबी झाला की त्यात वाटलेलं सारण घालावं. मीठ टाकून एक वाफ काढावी.
पापलेट स्वच्छ धुवून त्याच्या पाठीकडच्या भागाने सुरीने अलगद कापुन खण तयार करावा. आतला एेवज काढुन परत स्वच्छ धुवून घ्यावं.
दुसऱ्या बाजुन 3-4 चरे द्यावेत.

कापलेल्या पापलेटला मीठ,हळद, मसाला/लाल तिखट आणि अर्ध्या लिंबाचा रस लावावा.


सारण गार झाल्यावर ते पापलेटच्या आत भरावं.
तांदळाच्या पीठात वा रव्यात घोळवून पॅनमधे मध्यम आचेवर शॅलो फ्राय करावेत. साधारण 3-5 मिनीटं दोन्ही बाजुंनी खरपुस तळुन घ्यावं.