जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 27 December 2010

शेझवान ट्रिपल फ्राईड राईस

पदार्थ करायला खुप सोप्पे असतात. फक्त त्यांच्या पुर्वतयारीला थोडा वेळ लागतो. भाज्या निवडुन त्या निगुतीने कापणे हे थोडं वेळखाऊ काम. ते जमल की मग बाकीच हाय काय अन नाय काय!!!!!
साहित्यः
१ वाटी चिकन चे लहान तुकडे,
कोळंबी.
१/२ गाजर.
५-६ फरसबी.
२ पातीचे कांदे.
थोडासा कोबी.
१ भोपळी मिरची.
लसुण बारीक चिरलेला.
१ इंच आल्याचे जुलियंस.
१-२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
सोयासॉस
शेझवान सॉस.
मीठ चवी नुसार.
तयार भात.
न्युडल्स्.

कृती:
न्युडल्स् आणि भात आधीच तयार करुन ठेवावे.
चिकन आणि कोळंबी यांना १-१ चमचा सोयासॉस व शेझवान सॉस लावुन १० मिनिट मुरत ठेवाव. (दोन्ही सॉस मध्ये मीठ असत त्यामुळे वेगळ लावायची गरज नाही)

एका पॅन मध्ये १ चमचा तेल घेउन त्यात चिकन आणि कोळंबी शिजवुन घ्यावी.

चिकन आणि कोळंबी एक बशीत काढुन, त्याच पॅन मध्ये शिजवलेल्या न्युडल्स परतुन घ्याव्या आणि बाजुला काढुन ठेवाव्या.
त्याच पॅनमध्ये १ चमचा तेलावर लसुण्-हिरवी मिरची, आल परतुन घ्याव.


आच मोठी करुन थोडा शेझवान सॉस आणि भाज्या टाकुन परतावे. चवी नुसार मीठ टाकावे. चिकन आणि कोळंबी टाकावी.

लगेच तयार भात टाकावा आणि नीट मिक्स करुन घ्याव.

वाढताना आधी खाली भाताचा थर लावावा, वरुन न्युडल्स पसरवाव्या, वाटल्यास एक अंड्याचा पोळा काढुन वर ठेवावा.

1 comment: