जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 26 December 2010

सर्पोतेल

साहित्यः
१/२ किलो पोर्क, १०० ग्रॅम बकर्‍याची कलेजी.
१ मोठा कांदा बारीक चिरुन.
३-४ पाकळ्या लसुण-१/२ इंच आल बारीक चिरुन.
वाटणः
७-८ कश्मिरी सुक्या मिरच्या
३-४ लवंगा.
१ इंच दालचिनी.
७-८ काळीमिर्‍या.
१ चमचा जीर.
३ पाकळ्या लसुण .
१/२ इंच आल
१ चमचा हळद.
१/२ लिंबा एवढ्या चींचेचा कोळ.

कृती :
१) एका भांड्यात पाणी घेउन त्यात पोर्क मध्यम आचेवर १५ मिनिट शिजत ठेवाव.
२) शिजलेल्या पोर्कचे लहान तुकडे करावे.
३) पोर्कच्याच चरबी वर पोर्क, कलेजी (बारीक बारीक तुकडे करुन्),कांदा,आल-लसुण चांगल परतुन घ्याव.
४) जितका रस्सा हवा त्या प्रमाणात पोर्कचा स्टॉक्/पाणी टाकुन वरील वाटण टाकावे, मस्त एक वाफ काढवी.
टीपः शक्यतो हे आदल्या रात्री करुन दुसर्‍या दिवशी खावं. रस्सा आणि मसाला मुरल्याने लज्जत वाढते.

No comments:

Post a Comment