जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 26 December 2010

पोर्क चीली

नमस्कार मंडळी.
कुठल्याही बल्ल्वाला आपली कलाकृती साकारायला काय लागत? कच्चा माल... किचन? उहूं.. मला विचाराल तर त्याला लागतात चार प्रोत्साहनाचे शब्द आणि हक्काचे गिनीपीग.(गिनीपीग असल्याने कलाकृती कधीच बिघडत नाही, ती असते नवीन डिश smiley ) माझ्यातला खरा बल्लव जागा झाला तो १० वर्षां पुर्वी जेव्हा मी पहील्यांदा घर सोडल तेव्हा. (नाही नाही घरातुन पळुन नाही गेलो. पोटापाण्याच्या उद्योगा साठी घारा बाहेर पडायची वेळ आली, आणि नोकरी परदेशात आसल्या करणाने घर आणि देश दोन्ही एकादमच सोडाव लगल.) आणि माज़्या परदेश वास्तव्यात माला एक सोडुन चांगले तीन तीन गिनीपीग मिळाले.
दुबाईला माझ्या ऑफिसमधल्या तीन मित्रांनी माझ्या रहाण्याच प्रश्न सोडवला. त्यांनी मला त्यांच्याच फॅट मध्ये जागा दिली. चहा आणि उकडलेली अंडी इत्पतच त्यांच कुकिंगच ज्ञान मर्यादित होत. त्यामुळे माझी बल्ल्वगीरी चालु झाली. हे तिघे पाववाले होते, त्यामूळे मी जे काही नवनवीन प्रकार कारायचो ते वेग वेगळ्या प्रादेशीक डिश या नावाखाली विनासायास खपवु लागलो. एखाड्या दिवशी जर काही अळणी किंवा अर्ध कच्च राहील तर खुशाल काँटीनेंटलचा वर्ख लावायचो.
विकांताला घराशेजारच्या एका गोवन हॉटेलात जाउन चील्ड बीयर, मधुर गोवन लाइव्ह संगीत, आणि जोडीला पोर्क-चीली हे ठरलेलच, आम्ही आत शिरलो की वेटर पण काही न सांगता ही आमची ऑर्डर घेउन यायचा. आहाहा.... काय दिवस होते ते!!! तर एकादा सगळ्य़ांनी ठरवल की घरी पोर्क चीली बनवुया.. तस मी पोर्क कधी बापजन्मात बनवल न्हवत. पण बरेच वेळा खाल्ल असल्याने चवीचा अंदाज होता. दर प्रयोगा अंती चव सुधरत गेली.
कालच त्यातल्या एकाचा फोन आला होता. म्हणत होता बायकोने पोर्क बनवलय, पण साला आपली जुनी चव नाही त्याला. (बायको बहुधा दुसया खोलीत आसावी :? ). दोघ गप्पा मारत जुन्या आठवणींत रमलो.
फोन ठेवला. स्वस्थ बसवेना. चपला चढवल्या, रथ काढला तो सरळ सुपर मार्केट मध्ये. पोर्क आणलय. आजची ही पाककॄती जुन्या मित्रांना समर्पीत.

 कच्चा माल.
१/४ किलो. पोर्क. लहान १/२ इंचाच्या आकारचे तुकडे करुन घ्यावे.
१ कांदा मोठ्ठा चौकोनी कापालेला.
१ भोपळी (सिमला) मिरची.
२ चमचे आल लसूण पेस्ट.
व्हिनेगर.
३-४ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला.
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या.
मसाला, हळद, मीठ चवीनुसार

२) व्हिनेगर मध्ये पाणी घालुन (डायल्य़ुट ) पोर्क त्या पाण्याने स्वछ धुवुन घ्याव. त्याला हळद, मीठ,आल-लसणाची पेस्ट, मसाला लावुन कमित कमी ५-६ तास मुरत ठेवाव. (शक्यतो बनवायच्या आदल्या रात्री हे करुन ठेवाव).३) एका फ्राईंग पॅनवर १ चमचा तेल टाकुन पोर्क लहान आचे वर १५-२० मिनीट फ्राय कराव.
४) तयार मटण दुसया भांड्यात काढुन, त्याच तेलात लसूण, कांदा, मध्यम आचे वर २-३ मिनीट परतुन घ्यावे.५) कांदा पारदर्शक झाल्यावर त्यात हिरवी आणि भोपळी मिरची टाकुन २-३ मिनीट परताव.६) चवीचा अंदाज घेउन मीठ टाकाव आणि तयार मटण टाकुन २ मिनीट मोठ्या आचेवर परताव. कादा आणि मिरची पार गळुदेउ नये. खाताना त्यांचा करकरीत पणा जाणवला पाहीजे.फ्रिज मधली चिल्ड बीयर काढली, एक गल्लास भरला. मित्रांच्या नावाने चार थेंब आणि दोन खडे टाकले.
चियर्स.....1 comment: