जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 26 December 2010

चिकन बिर्याणी

आज रविवार परत एकदा कोंबडीचा घातवार . :)

कच्चा माल :
१ कोंबडी.
३ कप बासमती तांदुळ (१०-१५ मिनिट भिजवलेला).
गरम पाणी (तांदळाच्या दुप्पट).
प्रत्येकी २ चमचे हळद, मसाला/लाल तिखट, आलं पेस्ट, लसुण पेस्ट,
२ मोठ्ठे कांदे लांब उभे कापुन.
खडा मसाला दालचीनी , काळीमिरी, चक्रीफुल, लवंग, तमाल पत्रं.
३ चमचे बिर्याणी मसाला.
१ बटाटा (आवडत आसल्यास) लांब सळ्या (फ्रेंच फ्राइज च्या आकाराच्या उकडुन किंवा तळुन )
२ मोठ्ठे चमचे दही.
४-५ ऊभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या
मीठ, तेल अंदाजे.

कृती:

एका कोंबडीचे मध्यम आकाराचे तुकडे करुन त्यांना हळद, दही, तिखट, १/२ आलं लसुण पेस्ट, मीठ लावुन मस्त १/२ तास मुरत ठेवा.


मोठ्या भांड्यात तेल कडकडीत तापवा. त्यात खडा मसाला टाकुन थोड परतुन घ्या.त्यात कांदा, हिरव्या मिरच्या टाकुन कांदा गुलाबी होइस्तो परता.


उरलेली १/२ आल लसुण पेस्ट आणि बिर्यानी मसाला टाकुन परत तेल सुटे पर्यंत परता.


दुसर्‍या भांड्यात थोड्या तेलावर मुरवलेली कोंबडी साधारण ५-१० मिनिटं मध्यम आचे वर अर्धवट शिजबुन घ्या.


पहिल्या भांड्यात, भिजवालेला तांदुळ टाकुन हलक्या हाताने परता. जास्त ढवळलत तर तांदुळ तुटुन बिर्याणी ऐवजी खिचडी तयार होईल तेव्हा जरा बेताने.

नंतर तांदळात गरम पाणी टाका. झाकण ठेवुन दणदणीत वाफ येउद्या.भात अर्धवट शिजत आला की त्यात अर्धवट शिजवलेली कोंबडी टाका.हलक्या हातने मिक्स करा. मंद आचेवर तवा ठेवुन बिर्याणीच भांड तव्यावर ठेवा.


भात पुर्ण शिजल्यावर आच बंद करुन गरमा गरम वाढायला घ्या.

No comments:

Post a Comment