जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 27 December 2010

बोंडाची (केळफुलाची) भाकरी

अस्सल गावाकडची ट्रीट घेउन आलोय.
साहित्यः
१ केळीचे बोंड साफ करुन.
१ कांदा आडवा-उभा कापुन.

१ वाटी मोड आलेले वाल.
२ लहान चमचे धणे पावडर.
२ लहान चमचे जीरे पावडर.
२ वाट्या तांदळाचे पीठ.
१ लहान चमचा हळद.
२ चमचे लाल तिखटं.
२ मोठे चमचे बेसन.
२ मोठे चमचे तेल.
२ हिरव्या मिरच्या.
चवी नुसार मीठ.

कृती:
केळीचे बोंड साफ करुन घ्यावे. चित्रात दाखवलेला मधला दांडा आणि छोटी पाकळी काढुन टाकावी.

साफ केलेलं बोंड बारीक चिरुन घ्याव.
एका मोठ्या भांड्यात वरील सर्व पादार्थ एकत्र करावे.

चपातीच्या कणके सारख मळुन घ्याव. शक्यतो मळताना पाणी कमी वापराव. कांद्याच पाणी सुटते.

फ्राईंग पॅनमध्ये खाली केळीचे पान ठेवाव आणि त्यावर पीठ पसरवुन साधारण अर्ध्या ते पाउण इंच जाडीची भाकरी थापावी.

वरुन परत केळीच पान ठेवुन पानाच्या सर्व कडा दुमडुन घ्याव्या.

फ्राईंग पॅनवर झाकण ठेवुन मंद ते मध्यम आचेवर भाकरी भाजावी.
१५-२० मिनिटांनंतर भाकरी पानासकट उचलुन पालथी करावी आणि दुसर्‍या बाजुने पण भाजुन काढावी.

गवती चहा आणि आलं घातलेल्या गरमा गरम वाफाळत्या चाहा सोबत आनंद घ्यावा..

2 comments:

  1. मस्तच... बराच पेशंस आहे तुझ्याकडे.. बोंबिलाची भाकरी आठवली..

    ReplyDelete
  2. खरच एकदम घरीची आठवाण आली आणी तोंडाला पाणी ही ,बोंडाची भाकरी,बोंबिलाची भाकरी पेक्ष्या पोतेंडी बोललेले जास्त आपले पणाचे वाटते....

    ReplyDelete