जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday 27 December 2010

उकडहंडी

आज एका अत्यंत चवीष्ट भाजीची तितकीच सोप्पी कृती घेउन हजर आहे.
ही भाजी आमच्या गावी साधारण फेब-मार्च महिन्यात होळीच्या आसपास केली जाते. त्यावेळी वाडीत बर्‍या पैकी भाजीपाला असतो. गावी ही भाजी मातीच्या मडक्यात करतात. सगळे जिन्नस एकत्र करुन हे मडके एका खड्यात ठेवुन वरुन जाळ करतात. पण आपल्या शहरात एक वेळ मडक मिळेल पण ते पुरायच कुठे आणि जाळ कसा करायचा ?
पण एवढ्याश्या कारणासाठी आपण या चवीष्ट भाजीला का मुकावं बर? म्हणुन आपल्या घरात करता येइल अशी कृती देत आहे. जमल्यास कधी गवी गेलात तर मडक्यात पण करुन पहा.पण तो वर आपली शहरी कृती खालील प्रमाणे.....

साहित्य :

२५० ते ३०० ग्रॅम. कोनफळ.
२ मोठे बटाटे
२ मध्यम वांगी.
२ कच्ची भाजीची केळी.
२५० ते ३०० ग्रॅम पापडी/घेवडा.
आसल्यास वाल पापडी चे गोळे/दाणे.
३-४ शेवग्याच्या शेंगा.
१ रताळं.
१ वाटी किसलेला नारळ.
असल्यास पाती कांदा.
३-४ हिरव्या मिरच्या


मीठ, हळद, लाल तिखट, मसाला, तेल.

कृती :


१) एका जाड बुडाच्या भांड्यात भाज्यांचे जरा मोठेच तुकडे करुन घ्या.


२) यात चवी नुसार मीठ, हळद, लाल तिखट, मसाला, ३ मोठे चमचे तेल टाका.३) भज्या टॉस करुन सगळा मसाला,मीठ नीट पसरवुन घ्या.४) मध्यम आचे वर भांड्या वर झाकण (झाकणावर पाणी) ठेवुन दणदणीत वाफ येउद्या. ही भाजी पुर्ण पणे वाफेवरच शिजवायची. पाणी अजीबात टाकुनये.
जर भाजी खाली लागतेय अस वाटल तर आच लहान करा. तवा गॅसवर ठेवुन भांड तव्यावर ठेवा.५) साधारधा १५-२० मिनिटां नंतर झाकण काढुन एकदा परता. किसलेला नारळ टाकुन परत एक वाफ काढा.
कोनफळ शिजल की गॅस बंदा करा.वरुन खिसलेल खोबर आणि कोथिंबीर टाकुन गरमा गरम चपती सोबत वाढा.


2 comments:

  1. छान झणझणीत झालेली दिसतय.. टोपभर भाजी पस्त कराविशी वाटतेय.. कोनफळ नाही मिळत.. यामने प्रयत्न केला तर गोडसर झाली..

    ReplyDelete