जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday 26 December 2010

माझा स्वयं(पाक) प्रयोग

सध्या परत बॅचलर लाईफ चालु आहे. त्यामुळे स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न स्वतःलाच सोडवावा लागतोय. ईतके दिवस खिचडी नी मॅगीवर भागवत होतो. पण रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता. त्यामुळे येत्या रविवारी स्वतःलाच ट्रिट द्यायच ठरवल. आपल्या जिभेचे चोचले आपणच पुरवायचे आणि काय.

ऑफिस सुटल्यावर तडक खाटकाकडे गेलो. फर्मास १/२ किलो कोवळ बोकडाच मटण घेतलं. बाकीचे जिन्नस सुदैवाने घरी होतेच. (हा गैरसमज घरी गेल्यावर लगेच दुर झाला.) घेतल भिमाच नाव नी शिरलो स्वयंपाकगृहात. एकाच डिश ने काय होणार? म्हणुन दोन करायच ठरवल.

मटण चांगल २-३ पाण्यात धुवुन घेतल. मटणाचे दोन भाग केले, एक बोनलेस, आणि एक हाडाळ. थोडी हळद लावुन बाजुला ठेवल.

आलं -लसणाची पेस्ट आणायला फ्रि़जमध्ये डोलावलो आणि पहिली विकेट पडली. बाटली रिकामी. चरफडत लसुण सोलायला घेतला. (माझ्या लहानपणी, लसुण सोलणे आणि सुक खोबर खिसणे ह्या माझ्यासाठी सक्तमजुरी. ) लसुण आणि आलं वाटुन घेतल.

मग मटणाच्या दोन्ही हिश्यांना आलं-लसणाची ताजी पेस्ट, मीठ, मसाला लावला. (मोज-मापं विचारु नका. हे सार मी अंदाजान केल.)

हाडाळ मटणातत थोड दही घातल. बोनलेसमध्ये एक लिंबु पिळल आणि दोन्ही फ्रि़जमध्ये मुरत ठेवल. साधारण अर्धा ते एक तास.

मग बाकीच्या तयारी कडे वळलो. दोन कांदे उभे आणि एक बारिक चौकोनी चिरुन घेतले. फ्राइंगपॅन मध्ये थोड तेल घेउन त्यात लवंग, दालचिनी, काळीमिरी आदी खडामसाला टाकुन २ मिनिटं परतुन त्यात उभा चिरलेला कांदा गुलाबी होइस्तव परतुन मग एका ताटात काढुन ठेवला.

खोबर भाजयला डबा उघडलानी दुसरी विकेट गेली. एकदा वाटल कि कराव खोबर्‍याशिवाय. पण हॅ.. खाईन खोबर्‍याशीच म्हणत पायात वहाणा सारल्या. तरी बर दुकान घरापासुन जव़ळच (गाडीने फक्त २० मिनिटावर ) आहे. तिकडे दुकानात खिसलेल खोबर पाहुन कोण आनंद झाला सांगु. अंमळ हळवा झालो क्षणभर. दुकानातले सोपस्कार आटोपुन मोर्चा पुन्हा घराकडे वळवला.

एव्हना ८ वाजले होते. पोटात भुकेचा तर आगडोंब उसळलेला. झटपट खोबर भाजुन घेतेल. त्यात थोड लालतिखट घातल भाजताना. नंतर हे खोबर खडा मसाला + कांदा मिक्सर मध्ये वाटुन घेतलं.

सुक मटण करण्यासाठी , बोनलेस मटण फ्राइंगपॅन मध्ये थोड तेल घेउन त्यात टाकल. खाली लागु नये म्हणुन थोड पाणी टाकल.

एकीकडे सुक्या मटणावर हे संस्कार घडत असताना रश्याची तयारी चालु केली. कुकरमध्ये तेलावर थोडा खडा मसाला आणि चिरलेला कांदा टाकुन पार गुलाबी होई पर्यंत परतला. मग त्यात २ टोमॅटो बारिक चिरुन टाकले. हाताला लागतिल ते मसाले चमचा चमचा (यात मालवणी, संडेस्पेशल, येताना आईने दिलेला घरचा स्पेशल मसाला) टाकले.

मध्यम आचेवर बाजुने तेल सुटे पर्यंत परतत राहीलो. मग त्यात ते हाडाळ मटण टाकल. मीठ चाखलं. नी मग दिल कुकरच झाकण लावुन. अधुन मधुन दुसर्‍या शेगडीवरच्या सुक्या मटणाला पण ढवळत होतो.

कुकरच्या ३ दणदणीत शिट्या घेतल्या.
सगळ पार पडता पडता १०:३० वजले होते. एव्हाना पोटात कावळ्यांनी उच्छाद मांडला होता.
एकच कुकर असल्याने परत भात लावुन कुकर सुटायची वाट पाहण्याच त्राण उरल न्हवत.
घरी कबुस (लेबनीस रोट्या) होताच. त्यावरच वेळ मारुन नेली.

सुक मटण.

मटण रस्सा.

8 comments:

  1. णिषेढ... !!
    खूप वाईट वाटलं :-P

    ReplyDelete
  2. मी निषेध करणार नाही कारण पुढली ब्लॉगर मिट प्रतिकच्या घरी करायची असे कांचन ने सुचवले आहे सो...मला ती १००% अटेंड करायची आहे...:)
    प्रचंड !!!
    मला हा ब्लॉग फॉलो करायचे नक्की समाधान आहे का दुःख हे काहि कळेनास झालयं..[ह.घे]

    ReplyDelete
  3. हा हा हा.. अवश्य करू की कट्टा.
    पण सगळ्यांचा इथे येण्याचा खर्च पहाता मला एकट्यालाच एका तिकीट पाठवून दिलत तर ते जास्त स्वस्त पडेल. ;)

    ReplyDelete
  4. फोटो जबरी.. अन लिहिलंयही खूसखूशीत :)

    ReplyDelete
  5. प्रतिक, मला तुझ्या पोस्ट खूप आवडतात. आणि खादाडीचे प्रयोग तर खूपच मस्त असतात आणि जे ताट वर सजविलेले आहे. ते पाहून मी सुद्धा घरी ट्राय करून पहिले आहे.


    Just Nice

    ReplyDelete
  6. धन्स आनंद, कुळकर्णी साहेब , कल्पेश :)

    ReplyDelete
  7. Fabulous recipe.Please can you give me your moms special masala recipe..i need it for non veg curries.Please send it to ffiona25@gmail.com.I really appreciate you replying all my msgs.You are the best...

    ReplyDelete