जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 23 January 2011

रविवार पेश्शल : तंदुरी चिकन.

आज रविवार, पै पाहुण्यांचा दिवस म्हणजेच कोंबडीचा घातवार.
नेहमीच्या तांबड्या-पांढर्‍या रश्याला फाटा देउन आज तंदुरी करायचा घाट घातला होता.

साहित्यः२ चमचे घट्ट दही (शक्यतो पाणी काढुन टाकलेल.)
२-३ मोठे चमचे तंदुर मसाला.
१-२ चमचे लाल तिखट.
१/४ चमचा केशरी रंग. (आवडत असल्यास.)
२ चमचे तेल.
१-२ चमचे आल-लसुण पेस्ट.
२ चमचे लिंबाचा रस.
मीठ चवी नुसार.
१ आख्खी कोंबडी. स्वछ धुवुन साफ केलेली.


कृती:एका भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करुन घ्यावे.
कोंबडीला सुरीने चरे पाडुन वरील मिश्रण नीट चोळुन चोळुन लावावे. आणि कोंबडी फ्रिज मध्ये किमान १ तास मुरत ठेवावी.
ओव्हन २५० ते २७५ °C वर 15 मिनिटं तापवुन मग कोंबडी शिजत ठेवावी. २५-३० मिनिटांनी वरची बाजू खाली करुन परत २०-२५ मिनिटे शिजु द्यावं.


7 comments:

 1. अरे कसली डेड्ली आहे कोंबडी... आत्ता पाहिजे मला

  ReplyDelete
 2. Aai shapaththa!!! BhavaDyaa... hI recipi udyaa mipaa var haviye.
  aaNi tyaa Coconut chyaa prakaaraachi suddhaa!

  ReplyDelete
 3. कोणता ओव्हन आहे तो???
  खल्लास्स्स्स्स्स्स्स्स फोटो ;मस्त रे
  पा.कृ. सोपी वाटते आहे.

  ReplyDelete
 4. मंनोबा कंपनीचा मेक नाही आठवत नक्की (बहुतेक ignis ). पण वरती ४ गॅस शेगड्या + २ विजेवर चालणार्‍या शेगड्या आहेत आणि खाली विजेवर चालणारा ओव्हन आहे.

  ReplyDelete
 5. OMG...mi-pa style ne..badali bhar laal galali :P..

  khup easy ani do-able recipe. btw..tumchya gharachya aas paas empty apt aahe ka? shift vhav mhanate.. :)

  Love ur cooking. Way to go!

  ReplyDelete
 6. Excellent recipe//Could you tell me how u made the tandoori masala..

  ReplyDelete
 7. Thanks for your visit & reply Goancuisine&tiatr.
  I used a ready-made (Everest)Tandoori masala for this.

  ReplyDelete