जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Friday, 21 January 2011

नारळाचे मॅकरुन्स्

साहित्यः


एक बाऊल नारळाचा चव.
१/३ कप साखर/पिठीसाखर.
३-४ मोठे चमचे मैदा.
व्हॅनिला इसेंस.
२ अंड्यांतला पांढरा भाग.
चिमुटभर मीठ.

कृती:एका भांड्यात अंड्यांमधला फक्त पांढरा भाग वेगळा करुन थोडासा फेटुन घ्यावा.
मग त्यात बाकीचे जिन्नस घालुन चांगले एकजीव करुन घ्याव.


तयार मिश्रण साच्यामध्ये ओतुन घ्याव.


ओव्हन ०० ते २५ °C वर ठेवुन, २०-२५ मिनिटे बेक करत ठेवाव.2 comments: