जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Thursday, 23 August 2012

स्टफ्ड चिकन ब्रेस्ट

राम राम मंडळी, काय श्रावण सुटला की नाही अजुन? ज्यांनी सोडला असेल त्यांनी ही पाककृती करुन पहायला हरकत नाही आणि जे अनंतचतुर्द्शी पर्यंत थांबणार आहेत त्यांनी नुसती पहायला हरकत नाही.
नेहमी त्याच प्रकारच चिकन खाऊन कंटाळलेल्या जीवांसाठी हा थोडासा बदल. कमी तिखट, चीज यांमुळे मुलांच्या आवडीचं तर पालेभाजी, पौष्टिक अळंबी मुलांच्या पोटत गेल्यामुळे 'पालक' पण खुश. Winkसाहित्य :२ चिकन ब्रेस्ट.१ ते १/२ जुडी पालक.
थोडेसे मश्रुम्स्.
३ चीजच्या चकत्या.
सॉसेज (ऑप्शनल.)
२५ ग्रॅम बटर.
काळीमीरी पूड.
मीठ चवी नुसार.

कृती :एका भांड्यात थोडं पाणी खळखळून उकळवावं. आच बंद करुन नंतर त्यात निवडलेल्या पालकची पानं ३-४ मिनिट बुडवून (ब्लांच करावी) लगेच बाहेर काढावी.
मश्रुम बारिक चिरुन घ्यावे.
पालकची पानं ही चिरुन घ्यावी.फ्राइंगपॅनमध्ये बटर टाकुन त्यावर पालक आणि मश्रुम परतुन घ्यावे.
बटरमध्ये मीठ असतं आणि पालकमध्ये क्षार त्यामुळे चवी नुसार किंचीत मीठ घालावं.
आच बंद केल्यावर जे पाणी सुटलं असेल ते आणि थोडसं मिश्रण बाजुला काढुन ठेवावं. बाकी पालक आणि मश्रुम वेगळे काढुन ठेवावे.चिकन ब्रेस्टला उभा चरा देउन तो उघडावा.
वरुन खालुन मीठ भुरभुरवून १५ मिनीटं तसच ठेवून द्यावं.एका ब्रेस्टवर चीजची चकती ठेवावी. त्याच्यावर मश्रुम, पालकचं मिश्रण ठेवावं.
आवडत असल्यास १/२ सॉसेज ठेवावा.मग ह्या चिकन ब्रेस्टचा रोल करुन घ्यावा.

ओव्हन २००° C वर ५ मिनिटं तापत ठेवावा.
अॅ्ल्युमिनियम फॉईलमध्ये चिकन ब्रेस्ट गुंडाळुन तापलेल्या ओव्हनमध्ये २०-२५ मिनिटे शिजवून घ्यावं. (ओव्हन नसल्यास फ्राइंगपॅनमध्ये केलत तरी चालेल. वेळ कमी लागेल.)ओव्हन मधुन काढल्या नंतर फॉईल उघडावी. आत जे वितळलेलं चीज असेल ते बाजुला काढुन ठेवलेल्या पालकच्या रसात टाकावं.
फ्राइंगपॅनमध्ये १/२ चमचा तेल टाकुन त्यात १/४ चमचा लाल तिखट टाकावं आणि चिकनचे रोल त्यात १ मिनिट परतुन घ्यावे. वरुन ताजी काळीमीरी पुड भुरभुरावी.

सॉस :
फ्राइंगपॅनमध्ये बाजुला काढलेलं पालकच मिश्रण, रस आणि वितळलेल चीज (अॅवल्युमिनियम फॉईल मधला) मंद आचेवर ठेवावं.
गरजे नुसार पाणी टाकावं. १/२ चमचा कॉरन्स्टार्च पाण्यात मिसळुन ते ही टाकावं. थोडं दाट झालं की आच बंद करावी.2 comments:

 1. Excellent recipe.Can you show more chicken curries and please can you give me ur moms malvani masala recipe?..Thank you.

  ReplyDelete
 2. Thanks for your visit & reply Goancuisine&tiatr.
  I did't use Malavani Masala. But we do Prepare a special Masala for all kind of Non-veg recipes.
  You can find in detail recipe (its not by me but it is the same i use) here.

  http://www.misalpav.com/node/20012

  ReplyDelete