जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Saturday, 24 September 2011

ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन

नमस्कार मंडळी.

बाप्पा त्यांच्या गावी परतले. आणि आता काही  दिवसातच दुर्गा माता आपल्या भक्तांच्या भेटीस येतेय.  मग ९-१० दिवस काही उसंत मिळायची नाही तुम्हाला. तेव्हा म्हटल एक विकांत मिळतोय मध्ये तर तो सत्कारणी लावावा.

फार काही कटकटीची पाककृती नाही आज. चला तर लागा कामाला. आधी झटपट कच्चा माल गोळा करु.

साहित्य : 
१ बीयरचा कॅन. (लहान / मोठा / ब्रँड, चॉइस इज युवर्स.)१ कोंबडी स्वछ धुवुन आणि पेपर नॅपकीनने एकदम कोरडी करुन.१/२ चमचा साखर.
१ चमचा लसणाची पावडर.
१ चमचा लाल तिखट.
१ चमचा भाजलेली जीरे पुड.
१ चमचा मीठ.
१ चमचा भरड वाटलेली काळीमीरी पुड.
१ चमचा कांद्याची पुड.
२-४ मोठे चमचे ऑलिव्हच तेल. (ऑलिव्हच नसल्यास दुसर कसलही चालेल. ऑलिव्हच जरा हृदयासाठी बर असत.)
१ लिंबू.

कृती :सगळे मसाले एकत्र करुन घ्यावे.कोंबडीला ऑलिव्हच्या तेलने मसाज द्यावा.जस दिवाळीला आपण उटण खसा खसा चोळुन लावतो, तस तो एकत्र केलला मसाला कोंबडीला चोळावा.
बीयरचा कॅन उघडुन त्यातुन चांगले २-४ मोठ्ठे घोट रिचवावे. पण आवडते म्हणुन सगळी गट्टं करु नये. अर्धी शिल्लक ठेवावी. (थोडीशी सावधानी म्हणुन म्हणुन एक एक्स्ट्रा कॅन बाजुला ठेवलेला आहे हे चणाक्ष वाचकांनी ओळखलेच असेल Wink ) हा तर काय म्हणत होतो, दोन घोट मारल्या नंतर कॅनला वरुन २-३ भोके पाडुन घ्यावीत.
जो थोडा फार मसाला उरला असेल तर तो त्या कॅनमध्ये रिकामा करावा. एकदम भक्सन टाकुनये. अन्यथ्या ती बीयर, कोण्या अडाण्याने मीठ मसाला टाकला ते पहायला लगेच बाहेर येईल. आणि तुम्हाला नसता त्रास सहन करावा लागेल.एका ओव्हनप्रुफ भांड्यात कॅन ठेवुन कोंबडीला त्यावर बसवावे. हा आधी ती थोडी कां-कू करेल पण तिकडे दुर्लक्ष करुन तिची त्या कॅनवर प्रतिष्ठापना करा. एका लिंबाला २-३ टोचे मारुन ते (टोचे मारलेली बाजू खाली) कोंबडीच्या डॉक्याच्या जागी फिट्ट बसवावे.
(कधी कधी कोंबडी झिंगण्या आधीच आडवी होते. त्यामुळे तिस कॅन वर बसवताना काळजी घ्यावी. तुमच्या इथे जर कोंबडीसाठी पेश्श्ल बार स्टुल* मिळत असेल तर त्याचा वापर करावा. )
*

ही सगळी आरास उचलुन ओव्हन मध्ये ठेवावी. कोंबडीचे पंख लगेच करपतात म्हणुन त्यांना थोडी अ‍ॅल्युमिनियमची फॉईल लावली तर उत्तम.
ओव्हन* १८० ते २०० °C वर सेट करुन आणि कोंबडीला आत रखवालीस बसवुन तास-दिड तास भगीनी मंडळींनी आपल्या आवडत्या सास बहुंच्या कट-कारस्थ्यानात रममाण होण्यास हरकत नाही. ते नसेल आवडत तर आंजावर फेर फटका मारुन या. कॅलरी काँशस मंडळींनी नंतर वाढवार्‍या कॅलरीच्या प्रमाणात आधीच त्या जाळायला हरकत नाही.

*तुमच्या सोई नुसार, ओव्हन ऐवजी ग्रीलचा वापरही करू शकता.तासा दिड तासा नंतर झिंगुन टम्म झालेली ही कोंबडी बघा कशी खुणावतेय.
400
600

ओव्हन मधील उष्णतेने कोंबडीतील आर्द्रता कमी होऊन ती वातड होते. बीअर वापरल्याने ही आर्द्रता टिकुन रहाते. शिवाय तिच्यातील मॉल्ट आणि यीस्टच्या रासायनीक प्रक्रियेमुळे कोंबडीची चामडी पातळ आणि क्रिस्पी होते.
तरी ज्यांचे बीयरशी वाकडे आहे त्यांनी फळांचा रस आणि पीण्याचा सोडा वापरला तरी चालेल.


खालील चित्रफितीमध्ये मध्ये कोंबडी आतुन किती मॉईस्ट आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय.


14 comments:

 1. Hi!

  Chintu tu tar agadee pakka cook banalaa ahes ase vatate.

  Tuze abhinandan!

  Naren Mama

  ReplyDelete
 2. हे हे हे.. कसलं रें मामा असाच आपला थोडा टाईमपास. :)

  ReplyDelete
 3. changalee dish aahe beerla paryay tadi asu shakate ka?

  ReplyDelete
 4. हा हा हा.. जयूमामा हा प्रयोगही करून पहायला हरकरत नाही. ;)
  फक्त इथे ताडी मिळत नाही रे. :)
  मी गावी आलो की करू एकदा.

  ReplyDelete
 5. गणपा, तुस्सी ग्रेट हो...
  आपण मांसाहारी आहात हे आमचे भाग्य. आपले पाक कौशल्य आणि त्याच बरोबर रेसिपी (फोटोंसकट) लिहिण्याची हातोटी वादातीत आहे. फोटो पाहूनच पदार्थ किती खमंग, चवदार असतील याची खात्री पटते. तुम्ही आधी दिलेली 'पालक गोस्त'ची रेसिपी करून पहाण्या आधीच 'बीयर बम चिकन' आमच्या समोर आणलेत. आत्ता नवरात्र संपले की खा-रे-खा.

  ReplyDelete
 6. धन्यवाद सिद्धार्थ.
  नक्की करुन पहा आणि कळव कसं झाल होत ते. :)

  ReplyDelete
 7. Hello Pratik,

  मी गेले काही दिवस आपला ब्लॉग बघते/वाचते आहे. संपूर्ण रेसिपी अजून ट्राय नाही केली पण त्यातला हिंट्स चा नक्कीच उपयोग करते.
  मी शाकाहारी आहे पण तुमच्या मांसाहारी रेसिपीज सुद्धा वाचयला आवडतात.
  एखादी सुगरण स्त्री जितक्या तन्मयतेने स्वयंपाक करते तितक्याच devotion ने आपण पण करता.
  फोटो मधील एकसारख्या चिरलेल्या, arrange केलेल्या भाज्या, डिश मधे काढलेले मसाले ...all point to the same .. :)
  thanks for sharing.

  ReplyDelete
 8. धन्यवाद मंजिरी. :)
  कट्टर मांसाहारी असल्याने त्या पाककृत्याच जास्त आहेत.
  काही शाकाहारी पाककृत्या ही देण्याचा प्रयत्न करीन. :)

  ReplyDelete
 9. प्रतिक,
  बियरच्या कॅनवरची कोंबडी बघूनच छान वाटते आहे, नक्की करून बघणार, मी खाणार नाही पण खिलवणार नक्की. तुझ्या ब्लॉगवर चक्कर मारली आणि नवीन रेसिपी बघायला मिळाली की मस्त वाटतं, पुन्हा एकदा सांगावस वाटतं आहे की फोटोंची कल्पना खूप आवडली.

  ReplyDelete
 10. धन्यवाद वंदना.
  ब्लॉग आवडतोय हे ऐकुन छान वाटल. :)

  ReplyDelete
 11. भगवंता, आपले चरणकमल कुठे आहेत?

  ReplyDelete
 12. खूपच छान....मला विचारायचे आहे कि या साठी किती लिटरचा ओवन लागेल.

  ReplyDelete
 13. लिटर्समध्ये नक्की अंदाज नाही.
  माझ्याकडे जी शेगडी+ओव्ह्न आहे त्यातील ओव्हन अंदाजे १८ x १८ x १६ इंच आकाराचा आहे.

  ReplyDelete