आपल्या कडे पाव भाजी न आवडणारा विरळाच असावा. भाज्यांच्या नावे बोटं मोडणारी चिल्ली-पिल्ली पाव भाजीचं ताट समोर आल तर यथेच्छ ताव मारतात असा आज वरचा अनुभव आहे.
साहित्यः
२-३ मध्यम आकाराचे कांदे. (बारीक चिरुन.)
२ मध्यम आकाराच्या भोपळी/सिमला मिरच्या (बारीक चिरुन.)
२-४ टॉमेटो. (बारीक चिरुन.)
४ मध्यम बटाटे (उकडलेले.)
१ वाटी मटार (उकडलेले.)
२५० ग्रॅम फ्लॉवर (उकडलेला.)
१-२ चमचे आलं-लसुण पेस्ट.
लाल तिखटं. मीठं चवी नुसार.
पावभाजीचा मसाला. (मी शक्यतो बादशाहचा वापरतो. तो नसल्यास एव्हरेस्टचा. (ही या कंपन्यांची जाहीरात नव्हे ) )
बटर/लोणी.
पाव.
कृती:
उकडलेले बटाटे, फ्लॉवर, मटार मॅशरने कुस्करुन घ्यावे.
एका कढईत थोड तेल / बटर टाकुन कापलेला कांदा चांगला पारदर्षक होईस्तव परतुन घ्यावा.
थोड्या वेळाने त्यात बारीक चिरलेली भोपळी मिरची आणि आल-लसुण पेस्ट टाकुन परत चांगल परतुन घ्याव.
नंतर त्यात लाल-तिखट, पाव भाजीचा मसाला आणि टॉमेटो टाकुन परताव. मसाला टाकल्यावर तो लगेच खाली लागण्याची शक्यता असते. अश्यावेळी टॉमेटोचा सुटलेला रस मसाला खाली लागण्या पासुन बचाव करतो. पाणी शक्यतो टाकु नये.
तयार मिश्रण बाजुने तेल सोडु लागल की त्यात वरचे एकत्र केलेले उकडलेले जिन्नस टाकावे.
साधारण एक वाफ काढावी. भाजी एकजीव केल्यावर थोड्या वेळाने मग वाटल्यास थोडं पाणी घालुन भाजीची घनता आवश्यकते नुसार कमी करावी. चवी नुसार मीठ टाकाव.
पाव मधोमध चिरुन तव्यावर लोण्यात शेकुन घ्यावे. आवडत असल्यास तव्यावर बटर मध्ये अर्धी चिमुट पाव भाजीचा मसाला टाकुन त्यात पाव शेकुन घ्यावे.
वरुन कच्चा कांदा, कोथिंबीर आणि लोण्याचा गोळा (तब्येतीला मानवत असल्यास, चिज) टाकुन गरमागरम पावा सोबत वाढावे.