जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Wednesday 27 July 2011

अंडा करी



साहित्य :



४ अंडी. (उकडलेली वा कच्चीच आवडीनुसार.)



१ लहान चमचा हळद.
१ मोठा चमचा लाल तिखट.
१ मोठा चमचा भाजलेली जीरेपुड.
१ मोठा चमचा गरम मसाला.
दीड ते दोन चमचे आलं-लसुण पेस्ट.



दोन मध्यम कांदे उभे चिरुन.
दोन मध्यम बटाटे गोल फोडी करुन. (आवडत असल्यास.)
२-३ टॉमेटो बारीक चिरुन.
तेल, मीठ चवीनुसार.

कृती:



बटाट्याचे काप किंचीत मीठ लावुन थोड्याश्या तेलावर शिजवुन घ्यावे.



दुसर्‍या एका भांड्यात थोड्या तेलावर कांदा, आल लसुण पेस्ट टाकुन गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.
नंतर त्यात सगळे मसाले टाकुन तेल सुटे पर्यंत चांगल परताव. त्याच दरम्यान टॉमेटो टाकावा. मसाला खाली भांड्याला लागत असल्याच किंचीत पाणी घालावं.



टॉमेटो शिजल्यावर त्यात बटाट्याचे काप घालुन पुन्हा एकदा परताव.
ज्या प्रमाणात रस्सा हवा त्या नुसार पाणी टाकव. चवीनुसार अंदाज घेत मीठ टाकाव. झाकण ठेवुन एक वाफ काढावी.
ज्यांना उकडलेली अंडी आवडतात त्यांनी अंडी सोलुन त्याला सुरीने टोचे मारुन रश्यात टाकावी.
कच्ची अंडी आवडत असल्यास थोड्या थोड्या अंतरावर अंडी फोडुन टाकावी. (पण त्यानंतर बिल्कुल ढवळु नये.) परत वरुन झाकण ठेवुन १० मध्यम आचेवर शीजु द्यावे.



गरमागरम भाकरी सोबत लुत्फ घ्यावा.




Smile



11 comments:

  1. एकदम जबरी.. आवडती डिश ...!!

    गणपा भाऊ, एक विनंती - तू जसा कांदा आणि टोमॅटो कापतोस, ते कसब शिकवशील काय रे..

    जबरी प्रेसेंटेशन...आवडेश !!

    ReplyDelete
  2. >>तू जसा कांदा आणि टोमॅटो कापतोस, ते कसब शिकवशील काय रे.
    सुहास कसब(?) आहे का माहीत नाही पण जे काय शिकलोय ते टीव्ही वरचा एका जुना शो पाहून. "यान कॅन कुक सो कॅन यु"
    तुनळीवर याचे बरेच व्हिडियो आहेत. :)

    ReplyDelete
  3. भारी दिसतंय एकदम.. :) वाढ..वाढ... मी हातपाय धुवून आलोच... :)

    ReplyDelete
  4. प्रतीकभाऊ,
    अप्रतिम एकदम...
    बा द वे..तो डोसा आहे काय रे??

    ReplyDelete
  5. परत कांदा, टोमॅटो अन बटाटा कापलेला फोटो आवडला... सर्वच जबरी दिसतंय.. अन तो दोसा आहे का धिरडं ?

    ReplyDelete
  6. आनंद तो डोसा नाही, भाकरी आहे. तांदळाच्या आणि गव्हाच्या पिठाची.

    ReplyDelete
  7. मस्त. माझ्या रेसीपी मधे भरपूर मिरपूड घालतो, बाकी प्रोसीजर सेम..

    ReplyDelete
  8. प्रतिक,खरं म्हणजे आता सारखी सारखी तीच तीच प्रतिक्रिया काय द्यायची..आणि नाही दिली तर तुझ्यावर अन्यायही होईल....पण तरी न रहावुन देतेच...ज ब ह र !!!
    [आता अपेक्षा आहे की श्रावणात तरी ह्या रेसीपिज आम्हाला छळणार नाहित]
    बायदवे...काल मी तुझ्या ब्लॉगवरुन मुर्ग अचारी ट्राय केल...घरच्यांची प्रतिक्रियाः >>>>> अफलातुनsssssssssss,्भन्नाटsssssssssss :):P

    ReplyDelete
  9. एकदम झक्कास

    ReplyDelete