जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Saturday, 6 August 2011

खेकड्याच सुकं (क्रॅब मसाला)

श्रावण लागलाय पण आपण काय तो पाळत नाही. श्रावणात म्हावरं स्वस्त होतं अशी एक दंत कथा आहे. हल्ली म्हणे आपल्याकडे शाकाहार वाढु लागला आहे असं कुठल्याश्या एका सर्वेक्षण करण्यार्‍या कंपनीने शोध लावला. सगळ्या अफवा आहेत.... सालं जर हे खर असतं तर आज बाजार स्वस्त नसता झाला? मटण ३०० रु किलोवर पोहोचल असत?

असो. सध्या भारतात नसल्याने त्याची प्रत्यक्ष झळ बसत नाहीये. त्यातच काल बाजारत खेकडे (स्वस्तात) मिळाल्यावर श्रावण वगैरे काही न पहाता अस्मादिकांनी ते लगेच घेतले.
काल शुक्रवार होता. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचं नव्हत. त्यामुळे निवांत वेळ ही हाताशी होता, म्हणुन खेकड्याचे सुके करायचा बेत केला.

साहित्य :

 



१/२ चमचा हळद.
१ मोठा चमचा (प्रत्येकी) लाल तिखट, भाजलेली जिरे पुड, धणे पुड, गरम मसाला.
अर्धा-पाऊण इंच दालचीनी.
१ लहान चमचा काळीमीरी.
४-५ लवंग.
२ मोठे कांदे बारीक चिरेलेले.
२ मोठे टॉमेटो बारीक चिरलेले.
१ मोठा चमचा आल लसुण पेस्ट.
१ मोठा चमचा टॉमेटो पेस्ट.
२-३ हिरव्या मिरच्या.
कढीपत्ता.
तेल, मीठ चवीनुसार .




खेकडे साफ करुन घेतलेल.

कृती :



कडकडीत तापवलेल्या २ मोठे चमचे तेलात लवंग, काळिमिरे आणि दालचीनी परतुन घ्यावे.
नंतर मिरची , कडीपत्ता आणि कांदा टाकुन, कांदा पारदर्शक गुलाबी होई पर्यंत परतावा.
मग त्यात आल लसुण पेस्ट टाकुन कांदा चांगला परतवुन घ्यावा.
उरलेले सगळे मसाले टाकुन चांगल परताव. वाटल्यास किंचीत पाणी टाकाव. मसाला कलथ्याने सतत परतत रहाव.
  




मसाल्याला बाजुने तेल सुटु लागलं की मग टॉमेटो टाकुन चांगल मिक्स करावं.
टॉमेटो गळुन गेल्यावर मग त्यात टॉमेटोची पेस्ट टाकुन परताव.




तयार मसाला परत तेल सोडु लागला की मग त्यात साफ केलेले खेकडे सोडावे.
थोडसं पाणी टाकुन वरुन झाकण ठेवाव आणि १० मिनिटे वाफ द्यावी.
खेकड्याच सुक हव असेल मध्यम आचेवर पाणी आटे पर्यंत शिजत ठेवावे. रस्सा हवा असल्यास ताबडतोब आच बंद करावी.
वरुन कोथिंबीर पेरुन आणि लिंबू पिळुन आडवा हात मारावा.
पण जर फुरसत असेल तेव्हाच याच्या वाटे जावे. आणि हाणुन झाल्यावर मस्त ताणुन द्यावी.



14 comments:

  1. जबरदस्त !!

    मी मासे/खेकडा खात नाही, पण डिश एकदम अप्रतिम दिसतेय. तोंडको पाणी सुट्या ;-)

    ReplyDelete
  2. शाकाहारी नाही ना रे तु? नाही फक्त मासे /खेकडा म्हटल म्हणुन डौट आला.
    तस असेल तर हाय रे कंबख्त तुने खेकडा नही खाया तो क्या जीया. ;)

    ReplyDelete
  3. श्रावण पाळणारी लोकं तुझा कडकडून निषेध करतील बा! तुला अजून ’णीशेढ’ माहित ना! पण मी नाही पाळत श्रावण. त्यामुळे मला (नेहेमीप्रमाणेच) गहिवरून येतंय. नशीब की माझा नवरा हा ब्लॉग पहात नाही.

    ReplyDelete
  4. superb...आत्ताच्या आत्ता खावसं वाटतय...

    ReplyDelete
  5. मला श्रावण पाळणे आता खरचं कठीण जातयं...
    निषेध ही करायला मन मानत नाही..एनीवेज....चालु द्या तुमचं...
    आम्ही आहोतच नंतर...
    कांचन,पुढला ब्लॉगर मेळावा..ह्याच्या घरी नक्की...

    ReplyDelete
  6. डोळ्यांसमोरून फोटो हलत नाही रे! दुष्टा! तुझा धिक्कार असो. ;)
    वर्ड वेरिफिकेशनला शब्द काय आला असेल? mutton
    म्हणजे बघ, माझ्या भावना गुगलकाकांपर्यंतदेखील पोहोचतायंत.

    ReplyDelete
  7. अर्रर्र अनेकांच्या श्रावण मोडण्यास मी निमित्त ठरणार आहे की काय?
    हे बप्पा मला क्षमा कर.

    ReplyDelete
  8. तूर्तास ही गुरुदक्षिणा स्वीकारा गुरुवर्य ..

    फक्त एक गोची केली मी चुकून लाल तिखट समजून मच्छी मसाला घातला चांगला एक चमचा....म्हणजे आधीच मर्कट तशात प्याला...आमचं धनी जाम फ्यान झालय तुमच्या खादाडीच...पुन्हा वेळ मिळाला की त्याने केलेली बिर्याणी पण धाडेन



    https://plus.google.com/101925972755251710520/posts/KLVWURVbndr

    ReplyDelete
  9. प्रतिक,
    खूप मस्त पाककृती असतात, मी तुझ्या पध्दतीने सुकं मटण केलं आणि सगळ्यांना खूप आवडलं, मी स्वतः आता शाकाहारी झाल्याने खाल्लं नाही पण करायला खूप मजा आली. तुझ्या ब्लॉगची पध्दतपण खूप आवडली, प्रत्येक कृतीचे फोटो टाकायची कल्पना भन्नाट आहे. खूप छान, असेच नवनवीन पदार्थ टाकत रहा, मी तुझी फॅन आहे. नियमितपणे तुझा ब्लॉग वाचते...
    वंदना केंभावी

    ReplyDelete
  10. धन्यवाद वंदना. :)
    तुम्हा सगळ्यांची ही अशी कौतुकाची थाप माझ्यासाठी बुस्टींगच काम करते. :)

    ReplyDelete
  11. Accidentally ha blog saapadla. I love your writing style and your recipes. YOu make this crab recipe sound very simple--am going to try it soon!

    ReplyDelete
  12. उद्यासाठी लेकीने हीच फर्माईश केली आहे...त्यामुळे उद्या हेच !
    बघू कसं होतंय ते.
    तुझे मात्र आधीच आभार मानते. :)

    ReplyDelete
  13. khup chan..............khar tar sgalyach recipe ani lihinyachi paddhat apratim. tu barech divasat navin recipe post keli nahis. i miss ur recipes.

    ReplyDelete