जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Monday, 4 July 2011

मराठमोळी मिसळ

साहित्य :


३-४ मध्यम आकाराचे कांदे.
२ मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले.
१/४ किलो हिरवे उकडलेले वाटाणे.
५-६ पाकळ्या लसुण.
१ ते १.५ इंच आलं.
१ ते १.५ वाट्या लाल तिखट.
२ मोठे चमचे गरम मसाला.
१.५ वाट्या तेल.
चवी नुसार मीठ.
फरसाण. (फरसाण घेताना त्यात शक्यतो मनुका, चिवडा घेण्याच टाळावं.)

कृती :
आल-लसुण एकत्र वाटुन घ्याव.
दोन कांदे वाटुन घ्यावे.



अर्ध्या वाटी तेलात वाटलेला कांदा चांगला परतुन घ्यावा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात आल लसणाची पेस्ट टाकुन परत परतुन घ्याव.



त्यात १/२ वाटी लाल तिखट टाकुन बाजुने तेल सुटे पर्यंत परतत रहाव.



कांदा बाजुने तेल सोडु लागला की मग त्यात गरम मसाला टाकावा.



मग त्यात उकडलेले वाटाणे टाकुन चांगल ढवळुन घ्याव.



पाणी आणि चवीनुसार मीठ टाकुन एक उकळी आणावी.

कट:



कटासाठी दुसर्‍या एका जाड बुडाच्या पातेल्यात एक वाटी तेल तापवाव. त्यात एक लहान कांदा बारीक चीरुन टाकावा. एक वाटी लाल तिखट टाकुन चांगल परतुन घ्याव.



चवीनुसार मीठ टाकाव. खाली लागत असल्यास किंचीत पाणी टाकाव.

वाढणी :



एका पसरट भांड्यात सर्वात खाली फरसाण ठेवाव.



उकडलेल्या बटाट्याचे लहान तुकडे करुन वरुन वाढावे.



त्यावर वाटाण्याचा रस्सा घालावा.



वरुन बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू पेरुन सजवाव.



या मिसळीसोबत दुसर्‍या एका वाटीत नुसता कट, आणि पावा सोबत गरमा गरम वाढाव.


विसु. : ब्रंम्हांड आठवल्यास हव तर सोबत थंडगार मठ्ठा वा ताकाचा उतारा घ्यावा. पण यात दही टाकुन मिसळीचा अपमान करु नये. :)

9 comments:

  1. wowwwwwwwwwwww....superb !!

    ReplyDelete
  2. मस्त झणझणीत दिसतेय मिसळ!
    >>पण यात दही टाकुन मिसळीचा अपमान करु नये. :)
    हे खास!

    ReplyDelete
  3. मस्त......
    अवांतर...मला तुझी क्रोकरी आणि वाढण्याची पद्धत पण आवडली...क्रमवार फोटो टाकल्यामुळे न वाचतापण बरच काही कळू शकतं...:)

    ReplyDelete
  4. wah! lihilays hi mast..
    misal watanya peksha matki barobar mala jast awadte!! ekdum jhakkas .. ata aj kuthe tari jaun khane apariharya zale ahe !!

    ReplyDelete
  5. हे सुद्धा जमले. फक्त तिखट थोडे बेताने टाकले. :)

    ReplyDelete
  6. आपण धन्य आहात 🙏

    ReplyDelete