जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Wednesday 20 April 2011

खिमा-पाव

परवा प्रभ्याशी गप्पा हाणताना खिम्याचा विषय निघाला. तसा तो खुप आधी पासुन माझ्या मागे लागला होता की खिम्याची पाकृ दे एकदा. पण योग जुळुन आला नव्हता. असो तर ही पाकृ खास आपल्या प्रभ्याच्या आग्रहा खातर.

साहित्यः



१ लहान चमचा हळद.
१ मोठा चमचा मसाला (मालवणी/वाढवळ)
१ लहान चमचा गरम मसाला.
१ मोठा चमचा शाहीजीरे/जीरे.
१ मोठा चमचा धणे पुड.
१ मोठा चमचा जीरे पुड. (भाजलेले.)
१ मोठा चमचा काश्मिरी लाल तिखटं.
२ चमचे आलं-लसुण पेस्ट.
दालचीनी १ इंच.
२ वेलच्या.
१०-१५ काळीमिरे.
जवित्री (असल्यास)
तमाल पत्रं (असल्यास)



३-४ मध्यम कांदे (जितेके बारीक कापता येतील तेवढे बारीक कापुन.)
२ मध्यम टॉमेटो. (-------"------)
१ वाटी मटार दाणे.
२-३ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या. (ऐपती नुसार प्रमाण कमी जास्त करता येईल.)
कोथिंबिर.
एका लिंबाचा रस.
तेल, मीठ चवीनुसार.



१/२ किलो खिमा.

कृती:



एका कढईत १ डाव तेल तापवुन त्यात खडा मसाला आणि हिरव्या मिरच्या टाकुन परतुन घ्याव.
नंतर त्यात कांदा टाकुन तो गुलाबी होई पर्यंत परतुन घ्यावा.



नंतर त्यात बाकिचे मसाले (गरम मसाला वगळुन) टाकावे. लाल तिखट पाण्यात घोळवुन टाकावं.



मसाला नीट परतल्या नंतर त्यात टॉमेटो टाकुन तो पुर्ण गळे पर्यंत परतत रहावं.



वरील मिश्रण बाजुने तेल सोडु लागल की आच मोठी करुन त्यात खिमा टाकावा. आणि परतुन घावं.
(खिमा टाकताना आधी तो थोड पाणी टाकुन खिमा मोडुन घ्यावा. अन्यथा खिमा टाकल्यावर लगेच गुठळ्या होतात.)
नंतर आच मध्यम ते लहान करुन वर झाकण ठेवुन १५-२० मिनीटे शिजु द्यावं.



मटार टाकुन परत एकदा ५ मिनिटे झाकण ठेवुन शिजवुन घावं.
(जर मटार डिफ्रिज मधले असतील वा कॅन मधले शिजवलेले नसतील तर टॉमेटो टाकायच्या आधीच मटार टाकावे. )
लिंबाचा रस टाकुन वरुन गरम मसाला भुर भुरावा.




ताज्या पावा सोबत वा चपाती/भाकरी/पराठे जे उपलब्ध असेल त्याच्या सोबत ताव मारा. Smile

3 comments:

  1. khima mutton cha ahe ki chicken cha. Mutton cha asel tar shijayla varil vel purto ka? Pls reply.

    ReplyDelete
  2. मी मटण खिमाच वापरलाय. मटण कोवळ्या बकऱ्याच असेल तर तेवढा वेळ पुरेल.

    ReplyDelete