जन्मजात खाण्याची आवड. त्यात घरी आज्जी-आई यांना साक्षात अन्नपुर्णेचं वरदान लाभलेलं. हे कमी की काय म्हणुन बाबा आणि माझे मातुल हे सुद्धा बल्लव. मग हे खाण्या खिलवण्याच वेडं माझ्या रक्तात उतरल नसत तरच नवल. माझ्या अनेक आंतरजालीय स्नेह्यांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन मी ह्या ब्लॉगचा श्रीगणेशा करतोय. या ब्लॉगसाठी समर्पक नावं सुचवणार्‍या माझ्या दिदीचा आणि प्राजुताईचा मी आभारी आहे.

Sunday, 10 April 2011

फ्लॉवर इन चीज सॉस आणि वेंग वेंग

मराठी अंतर्जाल विश्वाने मला बरेच नवे मित्र दिले. त्या पैकीच एक म्हणजे आमचे मिपाकर नाटक्याशेठ. नाटक्याशेठहे स्वतः उत्तम शेफ आहेत. कॉकटेल्स् / मॉलटेल्स् हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्याच पुढाकाराने आम्ही दोघांनी मिळुन मिपावर एक नवा उपक्रम चालु केलाय. ज्यात त्यांच्या एखाद्या कॉकटेल / मॉलटेल सोबत मी एखाद स्टार्टर (आपल्या भाषेत चखणा. ;)) देणार आहे.
या उपक्रमाची सुरवात "फ्लॉवर इन चीज सॉस" आणि "वेंग वेंग" ने करीत आहे. आशा करतो तुम्हालाही हे आवडेल.साहित्यः
फ्लॉवर १/२ किलो.
चीज.
२ मोठे चमचे मैदा.
१ लहान चमचा मस्टर्ड सॉस.
१ कप दुध.
लाल तिखटं, काळीमीरी पुड.
सजावटीसाठी : काळे ऑलिव्ह मोठे आणि छोटे, गाजराच्या चकत्या, क्रिम चीज.कृती:फ्लॉवरचे छोटे (बाईट साइझ) तुकडे करुन घ्यावे.
१/४ कप दुधात पाणी टाकुन त्यात हे तुकडे शिजवुन घ्यावे. नंतर वरुन मीठ भुरभुरुन बाजुला ठेवुन द्या.

चीज सॉस.पॅनमध्ये २ चमचे ऑलिव्हच्या तेलात मैदा खरपुस परतुन घ्यावा.आच बंद करुन वरुन थोडं थोडं दुध टाकुन मिश्रण एकजीव करावं. गुठळ्या होउ देउ नयेत.नंतर त्यात चीज टाकुन परत ढवळावं.चीज वितळलं की मग त्यात चवी नुसार मीठ, लाल तिखटं, काळीमीरी पुड,मस्टर्ड सॉस टाकुन मंद आचेवर २-३ मीनिटं ढवळावं.फ्लॉवरचे तुकडे या सॉस मध्ये घोळवुन वरुन थोडं लाल तिखट भुरभुरुन, ओव्हन मध्ये ग्रील मोडवर (फक्त वरुन झळ लागेल असं) ५-१० मीनिटं ठेवा.
या सोबत पिणेकरांची (पुणेकरांची नाही याची नोंद घ्यावी, उगाच पंचाईत व्हायची आणि धाग्याचा खरडफळा व्हायचा) सोय म्हणून माझे या वेळेचे कॉकटेल आहे "वेंग वेंग" (Weng Weng).

साहित्य:

- १/२ औंस स्कॉच व्हिस्की
- १/२ औंस व्होडका
- १/२ औंस ब्रँडी
- १/२ औंस बर्बॉन (Bourbon)
- १/२ औंस टकिला
- २ औंस अननसाचा रस
- २ औंस संत्र्याचा रस
- चमचाभर लिंबाचा रस
- १ चमचा ग्रॅनडाइन
- बर्फ
- सजावटी साठी लिंबाचे काप, चेरी, स्ट्रॉ इ. इ. इ.

कृती:

शेकर मध्ये बर्फाचे खडे घ्या. त्यात अननसाचा आणि संत्र्याचा रस घाला त्यावर सगळी मद्ये ओता आणि चांगले एक मिनीटभर शेक करा. तयार झालेले मिश्रण एका मोठ्या ग्लासमध्ये ओतून घ्या. त्यात ग्रॅनडाइन अलगद सोडा. असा अलगद रस सोडायचा असेल तर एक चमचा घेऊन त्याच्या एका टोकावरून रस ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा.
आता या कॉकटेलला सजवण्यासाठी लिंबाचा/संत्र्याचा काप ग्लासच्या कडेला अडकवा. त्यावर टूथपिकने चेरी लावा (मी छोटी छत्री वापरली आहे). जर एखाददुसरे फॅन्सी स्ट्रॉ असतील तर त्या ग्लासमध्ये ठेवा.तर लोकहो लज्जतदार "फ्लॉवर इन चीज सॉस" आणि त्या सोबत "वेंग वेंग" कॉकटेल तयार आहे. हो जाओ शूरू!!!
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
धन्यवाद...

6 comments:

 1. हेहे!! व्वा व्वा! पिणेकरांची चांगली सोय केली आहेत तुम्हीं!

  मस्त वाटतेय फ्लावरची डिश! आई भजी करायची तसंच काहीसं...

  ReplyDelete
 2. फोटो क्लासिक आहेत. ते पेग्विन क्युट दिसताहेत. फ्लॉवरची रेसिपी सोपी आहे. करून पाहेन. डेकोरेशनसाठी छोट्या वांग्याचे पेग्विन तर करेनच करेन.

  ReplyDelete
 3. Mala hey penguins karaychet...please saanga na kase kelet. Penguins che doke kali draksha ahet ka? choch anhi paay gajarache kaltayt. Main body sathi kaay vaparlay? anhi pandhra bhaag kashyane kelay?

  ReplyDelete
 4. पेंग्विनचे डोके आणि पोट काळ्या ऑलीव्ह पासून बनवलेत. ऑलीव्ह छोटे ऑलीव्ह डोक्या साठी आणि मोठे शरीरासाठी. शरीरासाठी मधला थोडा भाग काढून त्यात चीज भरलय. पाय चोच गाजराची आहे. तर डोक आणि शरीर जोडायला टूथपीक वापरली आहे.

  ReplyDelete
 5. Saahi!!! Mhanjey hey decoration khau pan shakto apan, olives anhi cheese chaanach lagel, gajar tar asahi kachcha khatoch. Me hey nakki banven. Thanks a lot! Kasa suchta ho hey asa tumhaala? :)

  ReplyDelete