दुबईला लग्ना आधी आम्ही ऑफिस मधले ४ बॅचलर मित्र, पेइंगेस्ट म्हणुन एकत्र रहायचो. ४ खोल्यां पैकी २ खोल्या घरमालकाने भाड्याने दिल्या होत्या. त्या आम्ही चार मित्रांनी पटकावल्या होत्या. किचन वापरायची मुभा होती. पण शक्यतो ते जुम्मे के जुम्मेच वापरल जायचं. (नाही म्हणायला घर मालक जेव्हा सुट्टीत महिनाभर गोव्याला जायचा तेव्हा आमची चंगळ असायची.) त्यामुळे रोजच्या जेवणासाठी आम्ही मलबारी, पंजाबी, नेपाळी,पाकिस्तानी,मद्राशी अश्या वेग वेगळ्या होटेल्समध्ये वार लावले होते. (गोवन हॉटेल फक्त विकांतासाठी फिक्स असायच. )
दुबईत मलबार्यांची टपरीवजा हॉटेल पावसाळ्यात कोपर्या कोर्यात उगवणार्या कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी पसरलेली आहेत. आमच्या पैकी कुणी बाजीरावाची औलाद नसल्याने रोज चांगल्या हॉतेलात जाउन दुप्पट दाम मोजणे शक्य नव्हतं. त्यामुळेच कोपर्यावरचा स्वस्तातला 'तारुफ' मलबारी आम्हा गरीबांचा अन्नदाता होता. सकाळी २.५ दिर्हम मध्ये आमचा चहा नाश्ता आटोपायचा. ५० पैशांचा (फिल्स्) चहा, लच्छा पराठा सोबत चणा/मुगाची भाजी/खिमा/ऑमलेट/हाफ फ्राय/एग रोस्ट या पैकी काही तरी एक. किंवा मग कुठल्याही दक्षिण भारतीय हॉटेलात मिळणारे डोसा/इडली/वडा सांबर, अप्पम आदी पदार्थ. दुपारी जेवणात ४-५ दिर्हम मध्ये अनलिमिटेड (४ ला मोटा राईस आणि ५ ला बारीक राईस) थाळी मिळायची. तारुफ मलबार्याकडची बिर्याणी मस्त असायची. मी नेहमी तीच हाणायचो.
तर ह्या जुन्या आठवणी काढायच कारण असं की काल घरातला बहुतेक सगळा भाजीपाला खल्लास झाला होता. अगदी अडी नडीला साथ देण्यार्या बटाट्यांनी ही पाठ फिरवली होती. मोजुन ३ कांदे आणि २ टमाटि तेवढी बाकी होती. डिफ्रिजर उघडला तर तो पण 'आ'वासुन माझ्याकडेच पहायला लागला. दरवाज्यात ३ अंडी उरली होती. काल परवाच भुर्जी करुन झाली होती म्हणुन तो ऑप्शन पण बाद. आणि अचानक मलबार्याचा एग रोस्ट आठवला. नेहमीच्या बैदाकरी आणि अंडा भुर्जी खाउन कंटाळलेल्या माझ्या अंडेखाऊ बॅचलर मित्रांसाठी हा झटपट तयार होणारा मलबारी एग रोस्ट.
साहित्यः
२-३ उकडलेली अंडी.
४-५ पाकळ्या लसुण बारीक चिरलेला.
१/२ इंच आलं बारीक चिरलेल.
१ लहान चमचा जिरेपुड.
१ लहान चमचा धणेपुड.
१ लहान चमचा गरम मसाला.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमीरीपुड.
१/२ लहान चमचा हळद.
१ लहान चमचा मोहरी.
३ मध्यम कांदे उभे चिरलेले.
२ टॉमेटो एकदम बारीक चिरलेले.
कढीपत्ता.
३-४ मिरच्या (ऐपती नुसार.)
थोड्या तेलावर मोहरी, आलं, लसुण, मिरची, कढी पत्त्याची फोडणी करावी
कांद्यासोबत मीठ टाकुन चांगला परतुन घ्यावं.
कांदा गुलाबी झाला की मग त्यात टॉमेटो टाकुन तो पार गळे पर्यंत शिजवुन घ्यावं.
नंतर त्यात वरील सर्व मासाले टाकुन चांगल परतुन घ्याव. मसाला खाली लागत असल्यास किंचीत पाणी टाकावं.
बाजुने तेल सुटायला लागल की उकडलेली अंडी अर्धी कापुन त्यात टाकावी.
चपात्या/पराठ्यांच्या सोबतीसाठी गरमागरम एगरोस्ट तयार आहे.

कृती:

भारी दिसतंय.. ह्याचच एक variation मी ट्राय केलं - अंड उकडून घालण्याऐवजी फोडून घालायचं.. भुरजी करताना करतो तसं मिक्स नाही करायच मात्र. फक्त फोडून टाकायचे आणि तसच थोडसं शिजू द्यायचे.. करून बघ! झकास लागते!
ReplyDeleteखरय विनय.. आधी माझ्या डोक्यात पण हा विचार तरळुन गेला की उकडलेल्या अंड्या ऐवजी अंड फोटुन टाकावे. पुढल्या वेळी नक्की ट्राय करणार आहे. अंडाकरी मध्ये पण मला उकडलेल्या अंड्या पेक्षा फोडुन टाकलेलं अंडच जास्त आवडतं.;)
ReplyDeleteTried this recipee for our office potluck day..Turned out really well! Did one variation though, used Kandyacha Kees instead of sliced onion! Wonderful dish :-)
ReplyDelete